शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंच्या ‘वापसी’बाबत प्रश्नचिन्ह!

By admin | Updated: July 7, 2017 04:44 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात परत घेण्यासंदर्भात अद्याप हिरवा झेंडा दाखविलेला नाही. खडसेंच्या परतीचा चेंडू मुख्यमंत्री

विशेष प्रतिनिधी/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात परत घेण्यासंदर्भात अद्याप हिरवा झेंडा दाखविलेला नाही. खडसेंच्या परतीचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात असून, ते यासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी योग्यवेळी चर्चा करून निर्णय घेतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. भोसरी (पुणे) एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने आपला अहवाल सादर केला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा अहवाल आणि त्यावर सरकारने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालात खडसे यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची शिफारस केलेली नसली तरी काही ताशेरे ओढण्यात आल्याचे समजते. कारवाईची शिफारस नसल्याचे कारण देत खडसेंना मंत्रिमंडळात परत आणायचे की त्यांच्यावर ताशेरे असल्याने त्यांचे परतणे रोखायचे असे दोन पर्याय असून, मुख्यत: मुख्यमंत्री काय निर्णय घेतात आणि श्रेष्ठींसमोर काय भूमिका मांडतात यावर खडसेंचे परतणे अवलंबून असेल. गेल्या वर्षी ४ जून रोजी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्या वेळी भोसरीच्या जमीन खरेदीसह विविध आरोपांनी त्यांना घेरले होते. सूत्रांनी सांगितले की, उद्या खडसेंना मंत्रिपद पुन्हा बहाल करण्यात आले तरी क्रमांक २चे मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची जागा कायम राहील. शिवाय, खडसेंना पूर्वीचे महसूल मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता नाही. हे खाते पाटील यांच्याकडेच राहील. फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्या आधी आणि झाल्यानंतरही मुख्यमंत्री पदाची इच्छा लपवून ठेवू न शकलेले खडसे आता मात्र या शर्यतीत दिसत नाहीत. त्यामुळे खडसे हे फडणवीस यांना आव्हान असल्याची परिस्थिती आज राहिलेली नाही. खडसे मंत्रिमंडळात परतले तर आनंदच झोटिंग समितीचा अहवाल सचिवांकडे सादर झाला आहे. मुख्यमंत्रीच त्यावर निर्णय घेतील. खडसेंचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश झाला तर आनंदच होईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.