शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘केसरी टूर्सने ग्राहकाला 3.20 लाख रिफंड करावेत’

By admin | Updated: November 10, 2014 23:32 IST

मोठय़ा बहिणीचे अपघाती निधन झाल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला ऐनवेळी परदेशी सहल रद्द करावी लागली. मात्र त्यांची रक्कम रिफंड नाकारणा:या केसरी टूर्स प्रा. लि.ला ग्राहक मंचाने दणका दिला.

पुणो : मोठय़ा बहिणीचे अपघाती निधन झाल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला ऐनवेळी परदेशी सहल रद्द करावी लागली. मात्र  त्यांची रक्कम रिफंड नाकारणा:या केसरी टूर्स प्रा. लि.ला ग्राहक मंचाने दणका दिला. ग्राहकावर आलेल्या आपत्तीविषयी साधी सहानुभूतीही व्यक्त न करता रक्कम नाकारली, यावरही मंचाने खंत व्यक्त केली. टूर्सने तक्रारदारांना 3 लाख 2क् हजार रूपये रिफंड करावेत, 1क् हजार रूपये मानसिक नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च म्हणून 5 हजार रूपये द्यावा,असा आदेश दिला. 
मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर, क्षितीजा कुलकर्णी यांनी हा आदेश दिला. सतीशचंद्र वसंतराव घटवाल यांनी  केसरी टूर्स प्रा. लि. (फग्र्युसन रस्ता), संचालिका ङोलम चौबळ यांच्याविरूद्ध तक्रार दिली होती. 
घटवाल यांनी स्वत:सह प}ी व नात अशा तिघांसाठी हे पॅकेज घेतले होते. 17 मार्च 2क्12 रोजी सहलीच्या बुकींगसाठी त्यांनी 9क् हजार रूपये भरले होते. उर्वरित 3 लाख 1क् हजार रूपयेही भरले. 17 मे 2क्12 रोजी सहल निघणार होती. आदल्या दिवशी, 16 मे रोजी रात्री घटवाल यांच्या मोठय़ा बहिणीचे अपघाती  निधन झाले. यामुळे त्यांना सहल रद्द करावी लागली. अंत्यविधीनंतर त्यांनी पुन्हा केसरी टूर्सला रक्कम रिफंड करण्याविषयी सांगितले. यावर रक्कम रिफंड होणार नाही. पुढील टुरसाठी प्रत्येकी  25 हजार रूपयांची सवलत दिली जाईल, असे सांगितले. यावर त्यांनी 2क् टक्के म्हणजे 8क् हजार रक्कम वजावट करून देण्यास हरकत नसल्याचेही घटवाल यांनी सांगितले. तरीही त्यांना रक्कम परत मिळाली नाही. केसरी टुर्सच्यावतीने लेखी म्हणणो सादर करण्यात आले की, तक्रारदारांना रक्कम ‘नॉन रिफंडेबल’ असल्याचे माहीत होते आणि सहल त्यांनी रद्द केल्याने सेवेतील त्रुटीचा प्रश्न उद्भवत नाही.