शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

केळकर समितीवरून सरकारपुढे पेच!

By admin | Updated: December 23, 2014 00:12 IST

आघाडी सरकारने देखील हा अहवाल या व अशा कारणांमुळे मांडला नव्हता. विधानपरिषदेत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी सुचक वक्तव्य केले.

आघाडी सरकारने देखील हा अहवाल या व अशा कारणांमुळे मांडला नव्हता. विधानपरिषदेत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी सुचक वक्तव्य केले. ६५० पानांचा अहवाल आहे, वाचायला वेळ लागेल की नाही? आधी वाचू द्या, मग तो मांडू, असे म्हणत त्यांनी सुटकेची एक जागा खुली करुन ठेवली आहे. तरीही सरकार उद्या हा अहवाल मांडणार की नाही या विषयी कोणतीही स्पष्टता झालेली नाही. केळकर समितीच्या अहवालात अनेक गोष्टी विदर्भात अधिवेशन होत असताना मांडणे सरकारसाठी अडचणीचे आहे. अहवालानुसार दरडोई उत्पन्नात उर्वरित महाराष्ट्र (६८,८१० रू.), विदर्भ (५२,२८२ रू.) तर मराठवाडा (४०,८२४ रू.) असे चित्र आहे. मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न उर्वरित महाराष्ट्रापेक्षा ४० टक्क्यांनी तर विदर्भाचे २७ टक्क्यांनी कमी आहे. राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार जरी निधीचे वाटप होत असले तरी केळकर समितीने हे वाटप देखील नव्याने करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याचे पालन केले तर उर्वरित महाराष्ट्राला जास्त निधी मिळणार आहे. समितीने निधीचे वाटप करण्यासाठी अनुसूचित जाती, जनजाती यांच्यासाठीचा निधी वजा केल्यानंतर जो निधी उरेल त्यातला सर्वसाधारण क्षेत्रासाठी ७० टक्के व जलक्षेत्रासाठी ३० टक्के द्यावा असे सांगितले आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या राज्यातील ४४ तालुक्यांसाठी १७९८ कोटी, भूस्तर प्रतिकुल असणाऱ्या ८५ तालुक्यांसाठी १७३२ कोटी रुपये मालगुजारी तलावासाठी २५२० कोटी रुपये आणि खारपानपट्यासाठी ५४२ कोटी रुपये एवढा निधी मर्यादित काळापर्यंत सतत दिला पाहिजे. या क्षेत्रांना निधी दिल्यानंतर उर्वरित जलक्षेत्रांसाठी निधीवाटप करावे. ते वाटप देखील उर्वरित महाराष्ट्रासाठी ४३.१५ टक्के, विदर्भासाठी ३५.२६ टक्के आणि मराठवाड्यासाठी २१.५९ टक्के सुचवण्यात आले आहे. विशेष म्हणजे पेयजलाची तूट सगळ्यात जास्त उर्वरित महाराष्ट्रात ५४.६० टक्के एवढी आहे. तर ही तूट विदर्भात २२.३९ आणि मराठवाड्यात २३.०१ टक्के आहे. विकासाची तूट मात्र विदर्भाची ४८.१३ टक्के एवढी सगळ्ळात जास्त आहे. ही तूट मराठवाड्याची २०.१६ आणि उर्वरित महाराष्ट्राची ३१.७१ टक्के आहे.त्यामुळे हा अहवाल स्वीकारला तर विदर्भाच्या वाट्याला किती निधी मिळेल याविषयी या भागातल्या नेत्यांना शंका वाटत आहे. गेल्या आठवड्यात हा अहवाल सभागृहात येईल असे सांगितले जात होते पण तो आला नाही. आता अधिवेशन संपण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यातही उद्या विरोधकांचा अंतीम आठवडा प्रस्ताव आहे. हे लक्षात घेता केळकर समितीचा अहवाल सभागृहात मांडला जाईल, त्यावर चर्चा होईल हे सगळे मुद्दे अजूनतरी अधांतरीच आहेत.