शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्याच्या बाळाला घरात ठेवून या रणरागिणीने पाठलाग करत चोरट्यांना घडवली अद्दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 16:30 IST

बहाणा करुन बंगल्यात शिरलेल्या पाच चोरट्यांनी आयफोन पळविला; मात्र सहा महिन्याच्या बाळाला घरातच ठेवून धाडसी सुनेनं मोपेडवरुन पाठलाग करत चोरट्यांचा शोध घेतला.

उंब्रज ( सातारा ), दि. 13 - बहाणा करुन बंगल्यात शिरलेल्या पाच चोरट्यांनी आयफोन पळविला; मात्र सहा महिन्याच्या बाळाला घरातच ठेवून धाडसी सुनेनं मोपेडवरुन पाठलाग करत चोरट्यांचा शोध घेतला. उसाच्या फडात लपून बसलेल्या या चोरट्यांना पकडून अखेर पोलिसांच्या ताब्यातही दिलं. ही रणरागिणी म्हणजे उंब्रज येथील अभियंता चाँद शेख यांच्या सूनबाई असून माहेर असलेल्या सांगली-मिरज-कूपवाड महानगरपालिकेच्या तरुण नगरसेविकाही आहेत.  रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भीक मागण्याचे नाटक करून चार ते पाच मुलांनी उंब्रज येथील सुरभी चौकात राहणाऱ्या चाँद शेख यांच्या बंगल्याचे दार वाजवले. नाझीया नायकवडी-शेख यांनी दरवाजा उघडला. 'काही नाही,' असे सांगून पुन्हा दरवाजा बंद करत त्या आतील खोलीत निघून गेल्या.त्यानंतर  चोरट्यांनी लोखंडी दरवाजाच्या ग्रीलमधून हात घालून हळूच दरवाजा उघडला अन आत असलेला आयफोन घेऊन पलायन केले. दरम्यान, दरवाजा वाजल्याने नाझीया पटकन बाहेर आल्या. तेव्हा फोन चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या बंगल्यातून बाहेर आल्या. तोपर्यंत संबंधित चोरटे समर्थनगरकडे पळत गेले होते. त्यांनी पटकन आपली मोपेड बाहेर काढून त्यांचा पाठलाग केला. चोरटे जाधव मळ्याच्या बाजूकडील ऊसाच्या शेतात शिरले. नाझीया यांनी रस्त्यावर गाडी लावली.अन स्वतःही उसाच्या शेतात शिरल्या. चोरट्यांपैकी एक जण उसाच्या सरीत गुपचूपपणे झोपला होता. त्याला त्यांनी तेथेच पकडले. चोरट्यांनी बाजूलाच फेकून दिलेला मोबाईलही हस्तगत केला.या घटनेनंतर परिसरातील नागरिक गोळा झाले. यामुळे इतर चोरटे ऊसातून दुसऱ्या दिशेने पळून गेले. त्यानंतर नाझीया यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फोन करुन संबंधित चोरट्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. विशेष म्हणजे, नाझीया यांना सहा महिन्यांचे बाळ आहे. चोरी झाल्यानंतर बाळाला घरात ठेवूनच धाडसाने पाठलाग करत चोरट्याला मुद्देमालासह पकडण्याचे जे धाडस त्यांनी दाखविले, त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.