शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

भाडेकरू ठेवताय ?

By admin | Updated: February 4, 2015 00:55 IST

देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेले नागपूर शहर, दहशतवाद्यांच्या, नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिले आहे. गेल्या काही वर्षात शहरातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. खून, चोरी, चेनस्नॅचिंग

पोलिसांना द्या माहिती : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्कता नागपूर : देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेले नागपूर शहर, दहशतवाद्यांच्या, नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिले आहे. गेल्या काही वर्षात शहरातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. खून, चोरी, चेनस्नॅचिंग सारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नागपूर पोलीस सतर्कता बाळगत आहेत. बाहेरून येऊन येथे गैरकायदेशीर कृत्य करू नये, म्हणून पोलीस आयुक्तांनी शहरात भाडेकरू, पेर्इंगगेस्ट राहणाऱ्यांची सविस्तर माहिती घरमालकांकडून मागविली आहे. १ फेब्रुवारी ते ३१ मार्च पर्यंत घरमालकांनी सविस्तर माहिती संबंधित पोलीस ठाण्यात द्यायची आहे. भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालकांविरुद्ध भांदविच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहेत.राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि चळवळीच्या दृष्टिकोनातून नागपूर शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुण्यानंतर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल नागपूरकडे वाढला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेशातील अनेकांचे रोजगारासाठी नागपुरात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे नागपूरच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. शहराचाही त्याच गतीने विस्तार होत आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांच्या घटनेतही वाढ होत आहे. आज जवळपास शहरात ४० टक्के लोक किरायाच्या घरात वास्तव्य करीत आहेत. शहरात गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांमध्ये असामाजिक तत्त्व घर भाड्याने घेताना आढळले आहे. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये बाहेरून आलेले युवक जास्त सक्रिय असल्याचे आढळले आहे. शहरालगतच्या भागात फ्लॅट भाड्याने घेऊन देहव्यवसाय होत असल्याचे पोलिसांच्या धाडसत्रात उघड झाले आहे. या सर्व घटना शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास घातक ठरत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी भाडेकरूंची सविस्तर माहिती मागविली आहे. घरमालकांनी भाडेकरूबाबत संपूर्ण माहिती घेऊनच त्याला घर भाड्याने द्यावे, त्यांच्या फोटो आयडीसह संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देणे आवश्यक आहे. मात्र घरमालकांकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने पोलीस आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.