शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन वॉच ठेवणार

By admin | Updated: January 25, 2016 03:05 IST

‘इसिस’ला पायबंद करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कंबर कसली आहे. इसिसच्या प्रभावाखाली तरुण येऊ नयेत म्हणून, प्रबोधनावर एटीएसचा भर राहणार आहे

पुणे : ‘इसिस’ला पायबंद करण्यासाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कंबर कसली आहे. इसिसच्या प्रभावाखाली तरुण येऊ नयेत म्हणून, प्रबोधनावर एटीएसचा भर राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले जाणार असून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर सक्रीय होणार असल्याचे संकेत एटीएसचे प्रमुख विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.इसिसकडून तरुणांना आकर्षित करण्यासाठी आॅनलाइन माध्यमांचा सर्वाधिक वापर केला जात आहे. सोशल मिडियावर विविध व्हिडिओ टाकून त्याद्वारे प्रचार-प्रसार सुरू आहे. आपण शक्तीमान असल्याचे सांगत सहभागी होण्याचे आवाहन इसिसकडून केले जात आहे, असे फणसळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, या पार्श्वभूमीवर लवकरच एटीएसचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले जाणार आहे. तसेच अन्य सोशल मीडियाचा वापर केला जाणार आहे. इसिसच्या प्रयत्नांना ‘आॅनलाइन’बरोबरच ‘आॅफलाइन’ अशा दोन्ही प्रकारे काऊंटर करावे लागेल.सोशल मीडियावर काही अडचणी येत आहेत. त्यावर कशाप्रकारे मात करता येईल, याचा विचार सुरू आहे. दहशतवादी विचारांची माहिती मिळणार नाही किंवा अपलोड होणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. मागील सात-आठ महिन्यांत इसिससारख्या दहशतवादी विचारांचा प्रसार करणारी ९४ संकेतस्थळे एटीएसने पोलीस व अन्य यंत्रणांच्या मदतीने ब्लॉक केली आहेत. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारीच प्रसिद्ध केले आहे. फणसळकर यांनीही अशी संकेतस्थळे ब्लॉक केल्याचे सांगून ‘लोकमत’च्या वृत्ताला पुष्टी दिली.