शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाच्या मुळावर उठणाऱ्यांना बाजूला करा

By admin | Updated: January 13, 2017 04:23 IST

सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघातील पराभवाची कारणमीमांसा करताना मी खोलात गेलो

सातारा : सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघातील पराभवाची कारणमीमांसा करताना मी खोलात गेलो, तेव्हा सांगलीकरांचा ‘प्रसाद’ घेतलेल्यांची यादी माझ्या हाती लागली. ज्यांना आम्ही कष्टाने निवडून आणले, त्या मंडळींचीच नावे यात आढळून आली. तेव्हा यापुढे विरोधकांकडून पैसे घेऊन पक्षाला अडचणीत आणणारे कार्यकर्ते पक्षात नसतील तरी चालेल,’ असे परखड प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी येथे केले. तसेच ‘पक्षाच्या मुळावर उठणाऱ्यांना बाजूला करा,’ असा स्पष्ट आदेशही खासदार उदयनराजे यांचे नाव न घेता पवार यांनी याच भाषणात दिला.शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी कारखाना डिस्टिलरी-इथेनॉल प्लँटचे आधुनिकीकरण आणि अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यानंतर झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर त्यांनी सडकून टीका केली. मोदींच्या निर्णयाचे दुष्परिणाम सामान्य जनतेला दीर्घकाळ सोसावे लागणार असून, हाच मुद्दा घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सामान्य लोकांना जागृत करा, असा कानमंत्रही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. खा. पवार पुढे म्हणाले, ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत शेखर गोरेंच्या पराभवाने राष्ट्रवादीला लागलेला ठपका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत धुऊन काढू. यशवंतराव चव्हाण व किसनवीरांच्या जिल्ह्यात आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते तयार झाले, त्या जिल्ह्यात केवळ पैशांच्या आमिषाने विरोधकांना मते देणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. गरिबातला गरीब कार्यकर्ता निवडून आणण्यासाठी सज्ज व्हा.’ (प्रतिनिधी) शिवेंद्रसिंहराजेंचीही टीकाआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका मांडली. पक्षाच्या ताकदीवर पदे मिळवून पुन्हा पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याचा प्रकार थांबला पाहिजे. सातारा तालुक्यातून आम्ही यासंदर्भात घ्यायची ती भूमिका घेतली आहे; पण पक्षानेही याबाबत ठोस भूमिका घेण्याची वेळ आाल्याचे सांगत त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.