शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याने तरी चालू द्या!

By admin | Updated: April 6, 2017 02:15 IST

राजकीय पक्षांची कार्यालये थाटण्यासाठी संपूर्ण फुटपाथच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काबीज केल्याचे चित्र सध्या चेंबूर परिसरात दिसून येत आहे

मुंबई : पादचाऱ्यांना चालण्यासाठी असलेल्या फुटपाथवर राजकीय पक्षांची कार्यालये थाटण्यासाठी संपूर्ण फुटपाथच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काबीज केल्याचे चित्र सध्या चेंबूर परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही चालायचे तरी कसे? असा सवाल सामान्यांनी उपस्थित केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचा समावेश असल्याने कोणीही याबाबत पालिकेकडे तक्रार करण्यास पुढे आलेले नाही. पालिका अधिकाऱ्यांच्या मात्र ही बाब लक्षात येऊनही यावर अद्याप कारवाई झालेली नाही. एकीकडे चेंबूर परिसरात नागरिकांना सतत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्याच्या कडेने चालणे पादचाऱ्यांना कठीण बनते. अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनीही फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. त्यात भर म्हणून की काय, चेंबूरच्या गोल्फ क्लबसमोरील रस्त्यावर आणि आरसीएफ तलावाजवळ संपूर्ण फुटपाथ राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काबीज केला आहे. या ठिकाणी रिकाम्या जागेवर सेना, रिपाइं, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपापले झेंडे उभारून जागा अडवून ठेवली आहे. तर काहींनी या ठिकाणी अनधिकृत कार्यालये आणि दुकानेदेखील थाटली आहेत. ही दुकाने महिना ५ ते १० हजार रुपये भाड्याने देण्याचे उद्योग राजकीय पक्षांचे कार्यकर्ते राजरोसपणे करत आहेत. विशेष म्हणजे या दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकृत पुरावे नसताना विजेचे मीटरदेखील बसवण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्यांमध्ये कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणांत सगळेच राजकीय पक्ष सामील असल्याने कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. मात्र एखाद्या फेरीवाल्याने अशा प्रकारे जागा अडवली असती तर त्यावर पालिकेने तत्काळ कारवाई केली असती, असे एका फेरीवाल्याने बोलून दाखविले. नागरिकांनी मात्र या सगळ्या प्रकारावर पालिकेने तत्काळ कारवाई करून फुटपाथ पादचाऱ्यांसाठी खुले करावे, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी) >अधिकृत विजेचे मीटरविशेष म्हणजे या दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारचे अधिकृत पुरावे नसताना विजेचे मीटरदेखील बसवण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्यांमध्ये कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणांत सगळेच राजकीय पक्ष सामील असल्याने कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही.