शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता राखा, आजार टाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 05:58 IST

राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली असून, सर्वच जण पाऊस एन्जॉय करायच्या तयारीला लागले आहेत. मान्सून पिकनिकचे बेत आखले जात आहेत, पण पाऊस एन्जॉय करण्याआधी स्वत:च्या आरोग्याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे

मुंबई : राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली असून, सर्वच जण पाऊस एन्जॉय करायच्या तयारीला लागले आहेत. मान्सून पिकनिकचे बेत आखले जात आहेत, पण पाऊस एन्जॉय करण्याआधी स्वत:च्या आरोग्याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पावसाळा सुरू झाल्यावर दूषित पाणी आणि डासांमुळे होणारे आजार डोके वर काढतात. ताप, सर्दी, खोकल्याबरोबर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू, डायरिया, गॅस्ट्रो अशा आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता राखणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.पावसाळा सुरू झाल्यावर उघड्यावरचे अन्नपदार्थ, पाणी, यामुळे कावीळ, गॅस्ट्रो आणि डायरियाची लागण होण्याचा धोका असतो. या आजारांना रोखणे सहज शक्य आहे. दूषित अन्नपदार्थ आणि पाणी पिणे टाळल्यास, या आजारांना आळा घालता येऊ शकतो, तसेच अनेकदा घरी येणारे पाणीही दूषित असते. त्यामुळे पिण्याचे पाणी उकळूनआणि गाळून पिणे हा सर्वात सुरक्षित उपाय असल्याचे डॉ. वरदा वाटवेयांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पाणी साचून राहिल्याने डासांची उत्पत्ती होऊन डासांमुळे होणारे आजार बळावू शकतात. त्यामुळे डास चाऊ नयेत, म्हणून हात-पाय झाकले जातील, असे कपडे घाला. रात्री झोपताना डासांपासून बचावासाठी जाळ्या लावा. रुग्णांना डास चावणार नाहीत, याची काळजी घ्या. घरातील पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा तरी रिकामी करा. पाण्याची भांडी, पिंप पूर्ण बंद राहतील, याची काळजी घ्या, घट्ट झाकण लावा. आजूबाजूच्या परिसरात टायर, करवंट्या, अडगळीचे सामान राहणार नाही, याची काळजी घ्या, तसेच उच्चभ्रू वस्त्या, इमारतींमध्ये डासांची पैदास होणाºया ठिकाणांचा शोध घ्या, असा सल्ला ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन डॉ. जयेश लेले यांनी दिला आहे.पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे दुखणे अंगावर काढू नका. डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकलासारखा त्रास जाणवू लागल्यास डॉक्टरकडे जा. तपासणी करून घ्या. डॉक्टरच्या सल्ल्याने औषधे घ्या, असे आवाहनही तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.कुठे साचून राहते पाणी?पावसाळ्यात पाणी फक्त घराबाहेर नाही, तर घरातही साचते. त्यामुळे घराची स्वच्छता महत्त्वाची आहे. घरात लावलेल्या झाडांच्या खाली ठेवण्यात येणाºया ताटल्या, फ्रीज, एसीचा डक, फेंगशुई प्लँट, शोभेची झाडे या ठिकाणी पाणी साचून राहते, तसेच घराबाहेर म्हणजे गच्चीवर, ताडपत्री, भंगाराच्या वस्तू, टायर, रिकामे डबे या ठिकाणी पाणी साचून राहते. सात दिवसांपेक्षा अधिक काळ स्वच्छ पाणी साचून राहिल्यास त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. त्यामुळे घरातील आणि घराबाहेरील आवाराची स्वच्छता केली पाहिजे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळला पाहिजे. पावसाळी आजार टाळण्यासाठी स्वच्छता राखणे अतिशय आवश्यक आहे.पावसाळी आजार टाळा, ही काळजी घ्या!साचलेल्या दूषितपाण्यातून (प्राण्यांचे मूत्र, रक्त) चालणे टाळा.‘जोखीम’ गटातील व्यक्तींनी शारीरिक स्वच्छता राखा.कचरा उचलावा, गटारांमध्ये कचरा अडकून गटारे तुंबणार नाहीत, याची काळजी घ्यावी.रहिवासी क्षेत्रात पाणी अधिक काळ साठून राहणार नाही, याची काळजी घ्या. अन्नपदार्थ स्वच्छ जागीआणि झाकून ठेवावेत.साचलेल्या पाण्यातूनचालताना शक्य असल्यास गमबूट वापरावेत.जास्त ताप,डोकेदुखी, डोळे लालहोणे, अशी लक्षणेआढळल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊनउपचार घ्यावेत.