शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

प्रशासन पारदर्शक अन् गतिमान ठेवा - मुख्यमंत्री

By admin | Updated: April 23, 2017 02:36 IST

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामाला सकारात्मक विचारांची जोड देऊन प्रशासन पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख करावे, असे आवाहन मुख्यमंत्री

मुंबई : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामाला सकारात्मक विचारांची जोड देऊन प्रशासन पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सह्याद्री अतिथीगृहात शुक्रवारी नागरी सेवा दिन समारंभ झाला, या वेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. अरविंद सावंत, आ. राज पुरोहित व आ. मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वेळी पुढील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्र्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा- प्रथम पारितोषिक- महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे, (१० लाख रुपये), द्वितीय पारितोषिक- पोलीस अधीक्षक रत्नागिरी, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३ कल्याण (तत्कालीन पोलीस अधीक्षक रत्नागिरी) डॉ. संजय शिंदे, (६ लाख रुपये), तृतीय पारितोषिक- जिल्हाधिकारी रायगड शीतल तेली-उगले. (४ लाख रुपये)महसूल व वन विभाग- जिल्हाधिकारी (अहमदनगर) अनिल कवडे, जिल्हाधिकारी (अकोला) जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी (पालघर) अभिजित बांगर, जिल्हाधिकारी (नंदुरबार) मल्लिनाथ कलशेट्टी, तत्कालीन जिल्हाधिकारी (जळगाव) रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी (सोलापूर) रणजीत कुमार, जिल्हाधिकारी (नांदेड) सुरेश काकाणी, जिल्हाधिकारी (चंद्रपूर) आशुतोष सलील, जिल्हाधिकारी (यवतमाळ) सचिन्द्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी (ठाणे) महेंद्र कल्याणकर. महसूल व वन विभाग (वन)- अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (भावसे), कांदळवन, मुंबई, एन. वासुदेवन (मवसे), सहायक वनसंरक्षक (वनसंवर्धन व भूमिअभिलेख) वन भवन, नागपूर के.एस.इंगोले. गृह विभाग- अतिरिक्त पोलीस आयुक्त (मोटार परिवहन) बृहन्मुंबई-अतुल पाटील. कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग-मुख्य सांख्यिक पुणे- उदय अण्णासाहेब देशमुख, कृषी उपसंचालक सांख्यिकी पुणे- धनवंतराव पाटील, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग -उपसंचालक उद्योग संचालनालय मुंबई वि. जु. शिरसाठ, अधीक्षकीय उद्योग अधिकारी उद्योग संचालनालय मुंबई सु. रा. लोंढे.सार्वजनिक बांधकाम विभाग - साहाय्यक अभियंता-श्रेणी-२ नागपूर श्रीकांत रा. गुलकोटवार, साहाय्यक अभियंता-श्रेणी-२ नागपूर रिता शुक्ला. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग-शिक्षण विस्तार अधिकारी सातारा प्रतिभा भराडे, सहशिक्षक, जि. प. वरवंडी तांडा नं. २, पैठण जिल्हा औरंगाबाद भरत धोंडीबा काळे.जलसंपदा विभाग-सहायक कक्ष अधिकारी मंत्रालय मि. जी. कोळी, लिपिक-टंकलेखक मंत्रालय व प्र. भ. सावंत, सदस्य सचिव, वैधानिक विकास महामंडळ, उर्वरित महाराष्ट्र- प्रणाली मोहन वाडकेर. यांसह माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर आणि वरिष्ठ साहाय्यक संचालक किशोर गांगुर्डे यांचाही गौरव करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)