शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीत कंत्राटी भरती

By admin | Updated: July 1, 2016 03:40 IST

परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० बस चालकांअभावी धूळखात पडून आहेत.

कल्याण : परिवहन उपक्रमात दाखल झालेल्या ६० बस चालकांअभावी धूळखात पडून आहेत. त्यामुळे ‘ठोक पगारी तत्त्वावर’ चालक व वाहकांची भरती करण्याचा ठराव केडीएमटीने राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र, तो फेटाळण्यात आल्याने आता कंत्राटी पद्धतीवर चालक-वाहक नेमण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत केडीएमटी उपक्रमात १८५ बस उपलब्ध होणार आहेत. यातील १० व्होल्वो आणि उर्वरित ६० बस आॅगस्ट २०१५ मध्ये दाखल झाल्या आहेत. १० व्होल्वो या रस्त्यावर धावत आहेत. परंतु, चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे ६० बस वापराविना धूळखात पडल्या आहेत. त्यांचा आलटूनपालटून वापर केला जात आहे. पुरेशा बस असूनही चालक नसल्याने परिवहन उपक्रमाला नागरिकांना सेवा देण्यात मर्यादा येत आहेत. त्यामुळे तातडीने ठोक पगारी तत्त्वावर ४५० वाहक आणि चालकांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार, प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. सरकारने वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी नवीन पदनिर्मितीस बंदी घातली आहे. त्यामुळे सरकारने केडीएमटीचा ठोक पगारी भरतीचा प्रस्ताव फेटाळला. केडीएमटीत बाह्ययंत्रणेकडून (आउट सोर्सिंग) पद्धतीने भरती करावी. तसेच कोणतीही पदनिर्मिती न करता त्यावरील खर्च ‘कार्यालयीन खर्च’ या उद्दिष्टाखाली केडीएमटीच्या उत्पन्नातून भागवावा, असे निर्देश सरकारने दिले होते. त्यानुसार, उपक्रमाने गुरुवारच्या परिवहन समितीच्या बैठकीत प्रस्ताव दाखल केला होता. तो चर्चेला येताच सरकारचा यासंदर्भातील अध्यादेश समितीला सादर करावा, अशी मागणी करताना प्रशासनालाच कंत्राट नेमण्यात स्वारस्य असल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यावर, परिवहन समितीचा ठोक पगारी भरतीचा प्रस्ताव आयुक्तांनी सरकारला पाठवला होता. परंतु, तो नामंजूर झाल्याचे पत्र सरकारने आयुक्तांना पाठवल्याची माहिती के डीएमटीचे महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली. (प्रतिनिधी)>कंत्राटदाराला तीन महिने मुदतवाढकंत्राटी पद्धतीने चालक व वाहक कर्मचारी देणाऱ्या जी.ए. डिजिटल वेब वर्ल्ड या कंत्राटदाराची मुदत गुरुवारी संपुष्टात आल्याने त्याला मुदतवाढ देण्याचा प्रस्तावही दाखल करण्यात आला होता. दरम्यान, कंत्राटदार पुरेशा प्रमाणात चालक-वाहक पुरवत नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले.मुदत संपुष्टात येत असताना ऐनवेळी हा प्रस्ताव का आणला, हा समितीला वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. परंतु, मुदतवाढ न दिल्यास बससेवा ठप्प होईल, या सदस्यांच्या भावना लक्षात घेता संबंधित कंत्राटाला तीन महिन्यांची मुदतवाढ देत असल्याचे सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी स्पष्ट केले.