शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

करप्रणालीवरून केडीएमसीत जुंपणार

By admin | Updated: June 12, 2014 04:16 IST

एलबीटी (स्थानिक संस्था कर) रद्द करून जकात लागू करा, अशी मागणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी केली

कल्याण : एलबीटी (स्थानिक संस्था कर) रद्द करून जकात लागू करा, अशी मागणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी केली असता प्रशासनाने मात्र एलबीटी हितकारक असल्याचे म्हटले आहे. यावर एलबीटी आणि जकातही नको, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याने करप्रणालीवरून जुंपण्याची शक्यता आहे. या विषयावर १२ जून रोजी सायंकाळी प्रशासनाने बैठक बोलवली असून यात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.एलबीटीला व्यापाऱ्यांचा वाढता विरोध पाहता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलवलेल्या विशेष बैठकीत केडीएमसीच्या महापौर पाटील यांनी जकात लागू करा, अशी मागणी केली. यासंदर्भात त्यांनी चव्हाण यांना निवेदनही सादर के ले. एलबीटी लागू केल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा पाटील यांनी केला. महापालिका प्रशासनाने दाखवलेले एलबीटी वसुलीचे आकडे फुगीर आणि फसवे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केडीएमसी क्षेत्रातून २७ गावे वगळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. एकीकडे एलबीटीला महापौरांचा विरोध दिसून आला असताना दुसरीकडे ही करप्रणाली पारदर्शी असून महापालिकेच्या आर्थिक हिताची आहे. परंतु, शासनाने एलबीटीऐवजी अन्य कोणतेही पर्याय सुचवले तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. यासंदर्भात आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता एलबीटी केडीएमसीसाठी हितकारक असली तरी शासन जो निर्णय देईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. करप्रणाली लागू करण्यावरून प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात मतभेद दिसून आले असताना एलबीटी नको आणि जकातही नको, अशी भूमिका व्यापारी संघटनांनी घेतली आहे. त्यामुळे पेच निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. एलबीटी रद्द करून व्हॅटवर सरचार्ज लावण्याची आमची मागणी असल्याचे क ल्याण होलसेल मर्चंट असोसिएशन आणि कल्याण व्यापारी महामंडळाचे सरचिटणीस विजय पंडित यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)