शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीतील युती अपेक्षेप्रमाणे अभेद्य

By admin | Updated: March 1, 2017 03:58 IST

शिवसेना-भाजपा एकमेकांविरोधात लढले असले तरी केडीएमसीत युती अभेद्य असल्याचेच चित्र मंगळवारी दिसले.

कल्याण : मुंबई, ठाणे , उल्हासनगर महापालिकेच्या प्रचारात शिवसेना-भाजपा एकमेकांविरोधात लढले असले तरी केडीएमसीत युती अभेद्य असल्याचेच चित्र मंगळवारी दिसले. परिवहन सदस्यांच्या निवडणुकीत भाजपाला सहकार्य करून युती अभेद्य असल्याचे शिवसेनेने दाखवून दिले. मनसेच्या उमेदवाराला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आणि भाजपाचे प्रत्येकी तीन सदस्य निवडून आले आहेत. परिवहनच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात शिवसेना, भाजपाचे प्रत्येकी तीन तर मनसेच्या एका सदस्याचा समावेश होता. मंगळवारी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक पार पडली. महापालिकेतील १२० नगरसेवकांपैकी ११५ नगरसेवकांनी मतदान केले. एका नगरसेवकाचे मते बाद झाले. प्रत्येक नगरसेवकाला सहा मते द्यायची होती. पक्षीय बलाबलानुसार शिवसेनेचे तीन सदस्य सहजपणे निवडून जाऊ शकत होते, परंतु भाजपाचा तिसरा सदस्य निवडून जाण्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची आवश्यकता होती. मुंबई, ठाण्यासह अन्य महापालिकांच्या निवडणुकीत झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपाला सहकार्य करते का? अशा शंका-कुशंका उपस्थित होत असताना केडीएमसीत प्रथम भांडून नंतर एकत्र आलेल्या शिवसेना-भाजपानी युती अभेद्य ठेवली. युती अभेद्य राहिल, असे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते. शिवसेनेच्या सहकार्यावर समितीवर भाजपाचा तिसरा सदस्य निवडला गेला. मतमोजणी सहा फेऱ्यांमध्ये पार पडली. यात शिवसेनेचे मनोज चौधरी, संजय पावशे, मधुकर यशवंतराव तर भाजपाचे प्रसाद माळी, संजय राणे आणि कल्पेश जोशी हे सहाजण समितीवर निवडून गेले. मनसेचे उमेदवार संदेश प्रभुदेसाई हे सातव्या क्रमांकावर फेकले गेल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीतील विजयाकरिता राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारपासूनच केडीएमसीत ठाण मांडले होते. मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील हेही मंगळवारी महापालिकेत उपस्थित होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवसेनेने त्यांची अतिरिक्त मते भाजपाला दिल्याचे राज्यमंत्री चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महापौर देवळेकर यांनीही श्रेष्ठी जो निर्णय देतील तो मान्य केला जाईल, असे सांगितले.शिवसेनेने युती अभेद्य ठेवताना मनसेलाही सहकार्य केल्याचे त्यांना मिळालेल्या मतांवरून उघड झाले आहे. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये शिवसेनेचे मनोज चौधरी यांना सर्वाधिक (१०४), दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपाचे संजय राणे यांना (१०२), तिसरा क्रमांक शिवसेनेचे संजय पावशे (१०१) मते, चौथा आणि पाचव्या क्रमांकावर भाजपाचे प्रसाद माळी आणि शिवसेनेचे मधुकर यशवंतराव (९८) तर सहाव्या क्रमांकावर भाजपाचे कल्पेश जोशी (९७) मतांनी विजयी झाले आहेत. (प्रतिनिधी)>काँग्रेसने युतीला सहकार्य केल्याचा आरोपविरोधी गटातील काँग्रेसचे चारही नगरसेवक निवडणुकीच्या वेळी अनुपस्थित राहीले तर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांपैकी एकच उपस्थित होता. पाच नगरसेवक उपस्थित राहिले असते तर निकाल वेगळा लागला असता. काँग्रेसने अनुपस्थित राहून एकप्रकारे युतीला सहकार्य केल्याचा आरोप मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी केला आहे.