नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर आलिशान कार्यालय असलेल्या, तसेच गुंतवणूकदारांना तिप्पट रकमेचे आमिष दाखवून गंडा घालणा:या केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांविरुद्ध मंगळवार्पयत 5,9क्क् गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदविल्या. फ सवणुकीची रक्कम 155 कोटींर्पयत पोहोचल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ए़ एस़चांदखेडे यांनी दिली़
केबीसीचे प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण हे सिंगापूरला पळून गेले आहेत़ या प्रकरणी पोलिसांनी संचालक बापूसाहेब छबू चव्हाण, त्याची पत्नी साधना बापू चव्हाण, नानासाहेब चव्हाण, कंपनीचा व्यवस्थापक पंकज सीताराम शिंदे, वाहनचालक नितीन पोपटराव शिंदे, पोलीस कर्मचारी संजय वामनराव जगताप, त्याची पत्नी कौशल्या जगताप, भारती मंडलिक शिलेदार या आठ संशयितांना अटक केली होती़ या सर्वाची पोलीस कोठडीची मुदत संपली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत़
केबीसी प्रकरणात एजंट तसेच गुंतवणूक केलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका पुष्पलता निकम व त्यांचा मुलगा सागर निकम यांनी आत्महत्या केली, तर दोघांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. सिडकोतील एका वडापाव विक्रेत्याने काही दिवसांपूर्वी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़
या फ सवणूक प्रकरणात अटक केलेल्या संशयितांचे बँक खाते व स्थावर मालमत्ता अशी एकूण 73 कोटींची मालमत्ता पोलिसांनी सील केली आह़े (प्रतिनिधी)
केबीसीमध्ये फ सवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी अटक केलेल्या संशयितांच्या मालमत्तेची माहिती आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून द्यावी़ जेणोकरून त्यांची मालमत्ता सील करून गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा परत मिळण्यास मदत होईल़ पोलिसांनी केबीसी संचालकांविरोधात एमपीआयडी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला असल्यामुळे या कायद्यानुसार गुंतवणूकदारांना रक्कम निश्चित मिळेल़
- ए़ एस़ चांदखेडे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा