शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

केबीसी संचालकांच्या रेड कॉर्नरचा मार्ग मोकळा

By admin | Updated: August 9, 2014 01:44 IST

केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांच्या स्टँडिंग अटक वॉरंटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ यू़ कापडी यांनी शुक्रवारी परवानगी दिली़

नाशिक : राज्यभरातील गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांची फ सवणूक करून सिंगापूरमध्ये वास्तव्यास असलेला केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांच्या स्टँडिंग अटक वॉरंटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ यू़ कापडी यांनी शुक्रवारी परवानगी दिली़ यामुळे या दोघांच्याही रेड कॉर्नर नोटीसचा मार्ग मोकळा झाला आह़े दरम्यान, अटक केलेल्या संशयितांच्या बँक लॉकरबाबत सोमवारी निर्णय होणार आह़े
केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी न्यायालयाने स्टँडिंग अटक वॉरंटला परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती़ न्यायालयाने याबाबत पोलिसांकडे कायदेशीर तरतुदींबाबत विचारणा केली होती़ त्यानुसार शुक्रवारी सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणो यांनी न्यायालयाला याबाबतच्या तरतुदींची माहिती तसेच वॉरंटचे महत्त्व सांगितल़े त्यानुसार न्यायाधीश कापडी यांनी चव्हाण दाम्पत्याच्या स्टँडिंग अटक वॉरंटला परवानगी दिली आह़े
केबीसी फ सवणूक प्रकरणात पोलिसांनी अटक केलेले  संशयित बापूसाहेब छबू चव्हाण त्याची पत्नी साधना, नानासाहेब चव्हाण, कंपनीचा व्यवस्थापक पंकज सीताराम शिंदे, वाहनचालक नितीन पोपटराव शिंदे, पोलीस संजय वामनराव जगताप त्याची पत्नी कौशल्या, भारती मंडलिक शिलेदार यांचे विविध बँकांमध्ये असलेले लॉकर तपासणीची परवानगीही पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली आह़े यावर सोमवारी न्यायालय निर्णय देणार आह़े (प्रतिनिधी)
 
स्टँडिंग अटक वॉरंटला परवानगी
देशात गुन्हा करून परदेशात पळून गेलेल्या आरोपींबाबत रेड कॉर्नर नोटीस जारी केली जात़े त्यासाठी न्यायालयाच्या स्टँडिंग अटक वॉरंटची परवानगी आवश्यक असत़े केबीसीचे फ रार संशयित भाऊसाहेब व आरती चव्हाण यांच्या स्टँडिंग अटक वॉरंटची परवानगी आम्ही न्यायालयाकडे मागितली होती़ त्यानुसार आज न्यायालयात या वॉरंटची आवश्यकता सांगितली व न्यायालयाने आम्हाला तशी परवानगी दिली़ - पंकज डहाणो, सहायक पोलीस आयुक्त, नाशिक