शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बालकुमार युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी कवी दासू वैद्य

By admin | Updated: February 24, 2016 02:11 IST

बालकुमार युवा साहित्य संमेलनाचे बुलडाण्यात १२ मार्चला आयोजन.

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने , प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकाराने बुलडाणा येथे १२ आणि १३ मार्च रोजी राज्यस्तरीय बालकुमार युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, गीतकार दासू वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गणेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या एका बैठकीमध्ये साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा श्रीमती अरूणा कुल्ली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दोन दिवसीय बालकुमार युवा साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील दीडशेपेक्षा जास्त लेखक, साहित्यिक विविध कार्यक्रमात सहभागी होणार असून कार्यक्रमाच्या संयोजनपदी नरेंद्र लांजेवार यांची निवड करण्यात आली आहे.यासंदर्भात लवकरच एक स्वागत समिती गठीत करण्यात येणार आहे. या संमेलनात बालकुमार आणि युवकांसाठी कवी संमेलन, मुलाखत, परिसंवाद, अभिरूप न्यायालय, रिंगण नाट्य, प्रगट मुलाखत, मराठी-हिंदी-उर्दू गजल मुशायरा, युवा कट्टा, युवाजल्लोष अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आहे. या साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी २५ मार्चपर्यंत श्रीमती अरूणा कुल्ली, पंजाबराव गायकवाड, कि.वा.वाघ, प्रा.सुनील देशमुख यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने शाहिणा पठाण यांनी केले आहे.