शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर निश्चितच देशाच्या मुख्य प्रवाहात येईल

By admin | Updated: February 26, 2017 00:33 IST

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरशिवाय भारत देश अपूर्ण आहे. तेथे सातत्याने तणावग्रस्त वातावरण असूनही सरकारी योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीला

पुणे : जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरशिवाय भारत देश अपूर्ण आहे. तेथे सातत्याने तणावग्रस्त वातावरण असूनही सरकारी योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीला यश मिळत आहे. त्यामुळे काश्मीर निश्चितच देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केला.सरहद संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या काश्मीर महोत्सवाचे उद्घाटन जयराम रमेश यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जम्मू काश्मीरचे पर्यटन संचालक मेहमूह शह, फलोत्पादन विभागाचे संचालक महंमद हसन मीर, संयोजक शैलेश पगारिया, आतिश चोरडिया, सरहदचे संजय नहार आणि शैलेश वाडेकर आदी उपस्थित होते.रमेश म्हणाले, ‘काश्मीरमधील अशांततेचे वातावरण निवळून शांती आणि सद्भावना प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने प्रयत्न केले होते. दहावी अनुत्तीर्णांना प्रशिक्षण आणि रोजगार देणारी ‘हिमायत’, काश्मीरी युवकांना रोजगार देणारी ‘उडान’, महिला बचत गटांना बाजारपेठ मिळवून देणारी ‘उम्मीद’ या योजना सुरु केल्या होत्या. हे करताना घटनात्मक जबाबदारी पूर्ण करत असल्याची भावना सरकारमध्ये होती. राज्य सरकारच्या पर्यटन विभागानेही सांस्कृतिक देवाणघेवाण सुरु करण्यासाठी रोड शो सुरु केले आहेत. परंतु, सगळे काम सरकार करु शकणार नाही. त्यासाठी सरहदसारख्या संस्थांचे योगदान महत्वाचे आहे.’‘गेल्या वर्षी १३ लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती. पूर्वी काश्मीरला गेल्यावर गुजराती आणि बंगाली ऐकायला मिळायचे. मात्र, आता मराठी बोलणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. हे पाहून खूप आनंद होतो’, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)दमादम मस्त कलंदर...काश्मीरमधील लोकप्रिय गायक शफी सोपोरी आणि शमीमा अख्तर यांनी काश्मिरी, हिंदी गीतांसह सुफी रचना सादर करून महोत्सवाची शान वाढवली. ‘किसी के मुस्कुराहटों पे हो निसार’ या हिंदी गीतांसह ‘दमादम मस्त कलंदर’ या गाण्यांना उपस्थितांची उत्स्फूर्त दाद दिली.