शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरचा मुद्दा संपला आता विषय केवळ पाकव्याप्त काश्मिरचा : केंद्रिय गृहराज्यमंत्री

By admin | Updated: August 21, 2016 18:57 IST

किस्तानसमोर आता काश्मिरऐवजी केवळ पाकव्याप्त काश्मिरचा विषय शिल्लक असल्याची माहिती केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी (दि़२१) नाशिकमधील पत्रकार परीषदेत दिली़

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. २१ : भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा प्रयत्न केले मात्र पाकिस्तान सुधारण्याच्या स्थितीत नाही़ प्रत्येक वेळी काश्मिरचा मुद्दा उपस्थित करून भारतात दहशतवादी कारवाई करणाऱ्या पाकिस्तानसमोर पंतप्रधान मोदींनी पाकव्याप्त काश्मिरचा मुद्दा उपस्थित करून त्यांचा चर्चेचा विषयच बदलून टाकला आहे़.  त्यामुळे पाकिस्तानसमोर आता काश्मिरऐवजी केवळ पाकव्याप्त काश्मिरचा विषय शिल्लक असल्याची माहिती केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी (दि़२१) नाशिकमधील पत्रकार परीषदेत दिली़देशाच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केंद्रीय मंत्री व खासदारांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणांना भेट देण्यास सांगितले होते़ त्यानुसार नाशिकमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर व येवला येथील स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांचे स्मारकास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी रविवारी भेट दिली़ यानंतर शहर भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अहिर बोलत होते़केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांना पत्रकारांनी काश्मिरबाबत भारताच्या भूमिकेविषयी विचारले असता.

ते म्हणाले की, आतापर्यंत पाकिस्तान केवळ भारतातील काश्मिरच्या मुद्दा पुढे करून त्याबाबत चर्चा करीत होते़ काश्मिरबाबत पाकिस्तानची पुर्वीचीच भूमिका आजही कायम असली तरी आता पाकव्याप्त काश्मिरमधील बलुचिस्तानमधील नागरिकांनीच पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी केली आहे़ बलुचिस्तानमधील नागरिकांच्या प्रश्नाकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधून काश्मिरबाबतच्या चर्चेचा विषयच बदलून टाकला आहे़

भारताची काश्मिरबाबत भूमिका स्पष्ट असून याबाबत पाकिस्तानचा लाडिकपणा यापुढे खपवून घेणार नाही़ पाकिस्तानची ताकद आम्ही ओळखून असून यापुर्वी तीन वेळा त्यांना भारताने धूळ चारली आहे़ पाकिस्तानने आपल्या ताकदीचा भारताविरोधी वापर करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल़ तसेच आता चर्चेसाठी काश्मिरचा नव्हे तर पाकव्याप्त काश्मिरचा विषय असेल असेही अहिर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़ इसिसबाबत केंद्र गंभीर देशभरातील केरळ तसेच प्रामुख्याने महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील इसिसचा फैलावाबाबत केंद्रसरकार गंभीर आहे़ महाराष्ट्रातील मराठवाडा व परभणीतील इसिसच्या प्रभावाबाबतचा अहवाल राज्यसरकारकडून मागविण्यात आला आहे़ यामध्ये राज्य सरकारच्या सुचनेप्रमाणे तथ्य आढळल्यास केवळ राज्याचीच नव्हे तर केंद्राची संपूर्ण तपासी यंत्रणा याचा मूळापर्यंत शोध घेईल़ तसेच जी कुटुंबे इसिसच्या प्रभावाखाली असतील त्यांना यातून संपूर्णत: बाहेर काढेपर्यत हे काम सुरू राहणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री अहिर यांनी सांगितले़