शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘कासव’गतीने युतीचे संबंध सुधारत आहेत

By admin | Updated: April 13, 2017 01:29 IST

‘व्हेंटिलेटर’वर असलेले शिवसेना-भाजपा युतीचे संबंध ‘कासव’गतीने सुधारत आहेत, अशी मार्मिक टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली.

मुंबई : ‘व्हेंटिलेटर’वर असलेले शिवसेना-भाजपा युतीचे संबंध ‘कासव’गतीने सुधारत आहेत, अशी मार्मिक टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली. ‘कासव’, ‘दशक्रिया’ आणि व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटांनी यंदाच्या ६४व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारली. राष्ट्रीय चित्रपट विजेत्या चित्रपटांच्या चमूचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री या निवासस्थानी गौरव करण्यात आला. यानंतर, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या बैठकीत काय झाले, शिवसेना-भाजपातील दुरावा दूर झाला का, युती ‘व्हेंटिलेटर’वर आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर, ‘कासव’गतीने युती पूर्वपदावर येत असल्याची मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबाबतही उद्धव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. फक्त भावना व्यक्त करुन चालणार नाही. यांच्याबाबत फक्त पत्रव्यवहार करुन काही होणार नाही. ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.पाकिस्तान सतत डोके वर काढत आहे. त्यामुळेच पाकिस्तानला एकदा कायमचा धडा शिकवला पाहिजे, अशा शब्दात उद्धव यांनी कठोर कारवाईची मागणी केली. (प्रतिनिधी)- मराठी सिनेमा आणि कलाकारांचा अभिमान वाटतो. जगात कौतुक होत असलेल्या कलाकारांचे घरातही कौतुक व्हायला हवे. त्याच हेतूने या चित्रपटांचा एक महोत्सव एप्रिल महिन्याच्या अखेरीस शिवसेना चित्रपट शाखेच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा उद्धव यांनी केली.