शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

कास शाळा,अन्विका आर्ट्स प्रथम

By admin | Updated: February 23, 2015 00:14 IST

‘लोकमत’च्या डान्स स्पर्धेला रसिकांची वाहवा : ‘सोलो’मध्ये अनिकेत आसोलकर, प्रार्थना मातोंडकर अव्वल

सावंतवाडी : ‘लोकमत’च्या सिंधुदुर्ग आवृत्तीच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ग्रुप व सोलो डान्स स्पर्धेला स्पर्धक व रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत खुल्या ग्रुप डान्स स्पर्धेत कास येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १, कास विद्यालयाने, ग्रुप डान्स लहान गटात अन्विका आर्ट्सने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर सोलो डान्स स्पर्धेत खुल्या गटात अनिकेत आसोलकर व लहान गटात प्रार्थना मातोंडकर हिने अव्वल क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेतील प्रत्येक कलाविष्काराला प्रेक्षकवर्गाची वाहवा मिळत होती.‘लोकमत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या डान्स स्पर्धेला स्पर्धकांचा प्रतिसाद नावनोंदणीपासून सुरु झाला. तो अंतिम फेरीपर्यंत कायम होता. यावेळी खुला गट ग्रुप डान्स स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूल (पणती ग्रुप, सावंतवाडी), आरडीएक्स ग्रुप (सावंतवाडी), डीएड् कॉलेज (कणकवली), एस. आर. गु्रप (सावंतवाडी), सेंटर इंग्लिश स्कूल (एम. जी. फायर, सावंतवाडी), जिल्हा परिषद शाळा क्र. ७ (सावंतवाडी), गवाणकर कॉलेज (सावंतवाडी), डिस कॉड ग्रुप (सावंतवाडी), जिल्हा परिषद शाळा क्र. १ (कास), ओंकार गु्रप (सावंतवाडी), जवाहर नवोदय विद्यालय, (सांगेली), सावरवाड शाळा (सांगेली). लहान गट ग्रुप डान्स स्पर्धेत शाळा नं. २ अंगणवाडी (सावंतवाडी), शारदा मंदिर-वंदे मातरम् (सावंतवाडी), श्री कला अकादमी (सावंतवाडी), उर्मी ग्रुप (सावंतवाडी). मोठा गट सोलो डान्स स्पर्धेत तन्वी देसाई (सावंतवाडी), मृणाल सावंत (कुडाळ), खुशी पवार (सावंतवाडी), अनुष्का ठाकूर (कडावल), गौरेश राऊळ (वेर्ले), खुशी वारंग (सावंतवाडी), विद्या मादागसे (सावंतवाडी), शिवानी शिंदे (सावंतवाडी), भक्ती जामसंडेकर (सावंतवाडी), कृतिका यादव (सावंतवाडी), प्रतीक्षा सावंत (सावंतवाडी), पूजा राणे (सावंतवाडी), अनिकेत आसोलकर (सावंतवाडी). छोटा गट सोलो डान्स - जॉय डॉन्टस (सावंतवाडी), कनिष्क दळवी (सावंतवाडी), स्टेला डॉन्टस (सावंतवाडी), वैष्णवी गावडे (सावंतवाडी), साक्षी शेवाळे (सावंतवाडी), प्रार्थना मातोंडकर (सावंतवाडी) यांनी सहभाग दर्शविला होता. या प्रत्येक ग्रुपच्या व स्पर्धकांच्या नृत्याला रसिकांचा प्रतिसाद लाभला. यावेळी घेण्यात आलेल्या खुल्या ग्रुप डान्स स्पर्धेत कास येथील जिल्हा परिषद शाळा क्र. १ ने प्रथम क्रमांक मिळविला. तसेच ओमकार ग्रुप यांनी द्वितीय, तर तृतीय क्रमांक गवाणकर कॉलेज व आडीएक्स ग्रुप यांना विभागून देण्यात आला. ग्रुप डान्स लहान गटात प्रथम क्रमांक अन्विका आर्ट्स व द्वितीय क्रमांक शारदा विद्या मंदिर (वंदे मातरम्) शाळेने प्राप्त केला. सोेलो डान्स स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम अनिकेत आसोलकर, द्वितीय मृणाल सावंत व तृतीय क्रमांक पूजा राणे हिने मिळविला. तर लहान गटात प्रथम क्रमांक प्रार्थना मातोंडकर, द्वितीय क्रमांक स्टेला डान्टस हिने मिळविला.बक्षीस वितरण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पोलीस निरीक्षक रणजीत देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, लोकमत सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक, भालचंद्र पेडणेकर, अनंत विवेक राणे यांच्या हस्ते झाला. परीक्षक म्हणून प्रसन्न कोदे, साक्षी वंजारी आणि प्रतिभा चव्हाण यांनी काम पाहिले. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. ज्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे प्राप्त झाली नाहीत, त्यांनी सावंतवाडी ‘लोकमत’ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)साकारला इतिहासलोकमत ग्रुप डान्स स्पर्धेसाठी खास मुंबई येथून दाखल झालेले टी.व्ही. स्टार निवेदक तुषार सावंत यांनी स्पर्धेच्या निमित्ताने रसिकांना तीन तास खिळवून ठेवले. यात त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहासच रसिकांसमोर मांडत वाहवा मिळविली.