शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधी का मागितला?

By admin | Updated: December 12, 2014 01:32 IST

सीमाप्रश्न हा सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. संमेलनासाठी कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधीची मागणी करायला कशाला गेला होता?

बेळगाव : सीमाप्रश्न हा सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. संमेलनासाठी कर्नाटकच्या मंत्र्यांकडे निधीची मागणी करायला कशाला गेला होता? संमेलनासाठी निधी बेळगावकर मराठी भाषिकांनी गोळा करून दिला असता, असे सवाल संतप्त सीमावासीयांनी बेळगाव नाटय़ परिषदेच्या पदाधिका:यांना केला.
बेळगाव नाटय़ परिषदेच्या बैठकीनंतर ‘बेळगाव बिलॉँगस् टू महाराष्ट्र’ व ‘एकीकरण समिती’च्या युवा कार्यकत्र्यानी नाटय़ परिषद बेळगावच्या अध्यक्ष वीणा लोकूर यांना याबाबत जाब विचारला आणि मोहन जोशी यांच्या  विरोधात  घोषणाबाजी केली. बैठकीतील वृत्त सचिवांनी सांगितले आहे. त्याविषयी मला काही बोलायचे नाही, असे सांगून लोकूर निघून गेल्या. मोहन जोशी यांच्या वक्तव्याबद्दल नाटय़ परिषदेच्या  बेळगाव शाखेने याबाबत दिलगिरी व्यक्त करूनसुद्धा  बेळगावात  तीव्र  संताप व्यक्त करण्यात येत आहे.  बेळगाव शिवसेनेच्यावतीने नाटय़ परिषद कार्यालयासमोर जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. 
महाराष्ट्रातील सर्व साहित्य आणि नाटय़संमेलनातून सीमाप्रश्नाचा ठराव केल्याशिवाय  महाराष्ट्र  सरकारने  त्यांना आर्थिक मदत  देऊ नये. याशिवाय सीमाप्रश्नाचा ठराव केल्याशिवाय नाटय़संमेलन बेळगावात होऊ देणार नाही. जोशी यांनी माफी  मागावी असे एकीकरण समिती बेळगावचे उपाध्यक्ष टी. के. पाटील म्हणाले. सीमाप्रश्नासंबंधी मोहन जोशी यांनी असे वक्तव्य करणो चुकीचे आहे.  सीमाप्रश्नाचा ठराव मांडला गेला आह,े कदाचित मोहन जोशी यांना ठाऊक नसावे, असा टोला बेळगाव बिलॉँग्स टू महाराष्ट्रचे पीयूष हावळ यांनी लगावला. संमेलनासाठी कर्नाटक सरकारकडे मदत मागण्याची आवश्यकता काय होती? मराठी भाषिक जनतेने निश्चितच भरघोस निधी गोळा करून दिला असता. शिवजयंती, गणोश चतुर्थी, आदी उत्सव जनतेच्या हातभारानेच साजरे केले जातात, असे एकीकरण समितीचे राजू मरवे यांनी सांगितले.