शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात कर्म महत्त्वाचे : स्वरुपानंद

By admin | Updated: April 30, 2016 01:17 IST

जीवनात कर्म अत्यंत महत्त्वाचे असते. कर्माने अध:पतन आणि उत्क्रमणही होते.

पिंपरी : जीवनात कर्म अत्यंत महत्त्वाचे असते. कर्माने अध:पतन आणि उत्क्रमणही होते. त्यामुळे आपण कोणत्या प्रकारचे कर्म करावे, ते आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे. तसेच कर्म कोणत्या श्रद्धेने करतोय, हेही महत्त्वाचे आहे, असे मत स्वरुपानंद सरस्वती यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महापौर शकुंतला धराडे, माजी उपमहापौर माई ढोरे, माजी आमदार दिगंबर भेगडे, डॉ. सचिन पाटील, मुकुंद आवटे, मनोज ढोरे, कृष्णा दाभोळे आदी उपस्थित होते. व्यक्तिमत्त्व विकास व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्वरुपानंद सरस्वती म्हणाले की, जीवनाची खरी किंमत ही त्याच्या आचार-विचारावरून समजते. जीवनात फक्त पैसा महत्त्वाचा नसून, माणसाचा आंतरिक विकास होणे गरजेचे आहे. आंतरिक विकासातून सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. त्यामुळे माणसाचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत होईल. मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे शिक्षण देण्याची गरज असते. मनाचा आंतरिक विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुलांना काय शिकवायचे, हे ठरवायला हवे. त्यामुळे जीवनाचा खरा अर्थ समजण्यास त्यांना मदत होईल, असेही ते म्हणाले. अतुल राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले. (प्रतिनिधी)