शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल!

By admin | Updated: May 30, 2016 02:24 IST

कर्जत तालुक्यात कुपोषित बालकांच्या प्रमाणात दोन वर्षांत कमालीची घट झाली आहे.

कांता हाबळे,

नेरळ- कर्जत तालुक्यात कुपोषित बालकांच्या प्रमाणात दोन वर्षांत कमालीची घट झाली आहे. दोन वर्षांच्या सर्वेक्षणात संपूर्ण कर्जत तालुक्यात मध्यम कुपोषित व अतितीव्र कुपोषित अशी सुमारे ५२८ बालके सर्वेक्षणात कुपोषित असल्याची नोंद झाली होती. त्यानंतर एप्रिल २०१६ च्या सर्वेक्षणात हा आकडा १४५ वर येऊन पोहचला आहे. म्हणजेच यात सुमारे ३८० बालकांवर उपचार करून ही बालके कुपोषणमुक्त झाली असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने दिली आहे.कर्जत तालुक्यात नेरळ, कळंब, खांडस व अंबिवली, कडाव, मोहिली असे दोन बिट असून यामध्ये छोट्या अंगणवाड्या व मोठ्या अशा एकूण सुमारे ३३५ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांच्या सर्वेक्षणानुसार या कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. यात ६ महिने ते ३ वर्षाच्या बालकांना सोयाबीन पावडर, उपमा, शिरा असा आहार दिला जातो. जुलै २०१४ च्या सर्वेक्षणानुसार तालुक्यात मध्यम कुपोषित असे एकूण ४३३ बालके व अतितीव्र कुपोषित ९५ अशी सुमारे ५२८ बालके कुपोषित असल्याची नोंद झाली होती. यात सर्वात जास्त कुपोषित बालके ग्रामीण व आदिवासी भागात असल्याची नोंद झाली आहे. तर एप्रिल २०१६ च्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात घट झाली असून त्यात मध्यम कुपोषित ११२ तर तीव्र कुपोषित ३३ बालकांचा समावेश आहे. परंतु मागील वर्षापासून शासनाकडून या बालकांवर योग्य ते उपचार होत नसल्याचे आढळून आले आहे. मागील महिन्यात तालुक्यात शून्य ते पाच वयोगटातील तीन आणि जन्मत:च तब्बल ३६ बालकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोग्य विभाग सुस्त असल्याबद्दल कर्जत तालुक्याच्या आमसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. २०१५-१६ या आर्थिक वर्षात मंजूर आरसीएच, पीआयपीमध्ये केंद्र शासनाकडून बाल विकास केंद्रासाठीचा निधी मंजूर के ला नाही. त्यामुळे प्रत्येक बाल विकास केंद्र बंद करण्याचे जिल्हा परिषदेला पत्राद्वारे कळविले आहे.शासनाकडून निधी बंद झाल्याने कुपोषित बालकांवर उपचार केले जात नाहीत. सध्या कर्जत तालुक्यातील कशेळे येथील शबरी सेवा समिती व कर्जतमधील लाइट आॅफ लाइफ संस्थेकडून या कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांना औषधे पुरविली जातात. >कर्जतमधील कुपोषित बालकांना तपासणी करून औषधे देण्यात येत आहे, तसेच गरोदर मातांची नऊ महिन्यांत चार वेळा तपासणी करण्यात येते. ज्यांचे वजन व रक्त कमी असेल त्यांना औषधे व गोळ्या देण्यात येतात.- डॉ.सी.के. मोरे,तालुका वैद्यकीय अधिकारी कर्जतअनेक अंगणवाड्यांमधील बालकांची आरोग्य तपासणी करून कुपोषित तसेच अनेक प्रकारची आजारी बालके आढळल्यास त्यांना मिल्ट विटॅमीन सिरप देण्याचे काम आमची संस्था करत आहे. तसेच अनेक अंगणवाड्यांमध्ये कॅप आयोजित करून त्यांच्यावर उपचार केले जातात.- डॉ. गीतांजली हजारे,लाइट आॅफ लाइफ संस्था, कर्जतकर्जतमधील अनेक कुपोषित बालकांवर उपचार केले आहेत. तसेच तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम शबरी समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच अशा अनेक बालकांना आयुर्वेदिक औषधोपचार केले जात आहेत.-प्रमोद करंदीकर,सचिव, शबरी सेवा समिती, कशेळे>सध्या कर्जत तालुक्यातील कशेळे येथील शबरी सेवा समिती व कर्जतमधील लाइट आॅफ लाइफ संस्थेकडून या कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांना औषधे पुरविली जातात.