शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

करकरेंंची हत्या ब्राह्मण्यवाद्यांनीच केली

By admin | Updated: December 31, 2014 09:56 IST

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांचा यांची हत्या ब्राम्हण्यवाद्यांनी केल्याचा दावा माजी पोलिस महानिरीक्षकांनी केला.

माजी पोलिस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ : मालेगाव बॉम्बस्फ ोटातील आरोपींचे पुरावे करकरेंच्या हातीकोल्हापूर : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या ब्राम्हण्यवाद्यांनी केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या दहशतवादी कारवायांचे पुरावे असणारा लॅपटॉप करकरेंना मिळाले होते. या लॅपटॉमध्ये रेकॉर्ड केलेल्या संभाषणाच्या व्हिडीओ आणि आॅडिओ क्लिप्सचा उलगडा करकरे करत होते. हा उलगडा समोर आल्यास देशप्रेमाच्या नावाखाली सुरू असलेले दहशतवादी कारवायांचे पितळ उघडे पडेल, या भीतीपोटीच ब्राम्हण्यवादी संघटनांनी हेमंत करकरेंचा खून केला, असे प्रतिपादन माजी पोलिस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी केले. श्रमिक प्रतिष्ठान, समता संघर्ष समिती आणि आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीने शाहू स्मारक येथे मंगळवारी आयोजित ‘हू किल्ड करकरे’ या व्याखानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा , कर्नल पुरोहितसह अन्य आरोंपीच्या संभाषणाची व्हिडीओ आणि आॅडिओवर करकरेंचा तपास सुरू होता. कट्टर ब्राम्हणवाद्यांचा समावेश असलेल्या अभिनव संघटनेशी हे आरोपी संबंधित होते. या घटनेतील पुरावे समोर आल्यास ब्राम्हण्यवाद्यांचा चेहरा देशद्रोही म्हणून समोर येईल, या भीतीने करकरेंना संपवण्याचा डाव आखण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला़ देशाच्या सुरक्षा क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा आयबीमधील उच्चपदस्थ ब्राम्हण्यवाद्याचाही सहभाग आहे. कारण अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने भारताच्या रॉ या संघटनेला लष्कर -ए-तोयबाचे अतिरेकी मुंबईत येत असल्याची पूर्वसूचना दिली होती. त्यानुसार रॉ ने आयबीला ही माहिती दिली होती. पण आयबीने ही माहिती मुंबई पोलिसांना तसेच वेस्टर्न नेव्हल कमांडला दिली नाही. आयबीने ही माहिती मुंबई पोलिसांना दिली असती, तर २६ / ११ चा हल्ला टळला असता. पण जाणूनबुजून आयबीने ही माहिती दिली नाही, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला. मुंबई हल्ल्यांनतर दाखल केलेल्या आरोपपत्रात पोलिस नियंत्रण कक्षाकडे केलेल्या फोनचे टॅपिंग, करकरेंचा मोबाईल, सीएसटीच्या मेन लाईनचे सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे, कामा हॉस्पिटलमधील गोळीबार, या प्रकरणातील अंर्तगत रिपोर्ट आदी बाबींचा विचार आरोपपत्र दाखल करताना करण्यात आलेला नाही. हे प्रकरण दाबण्यासाठी उच्चस्तरीय यंत्रणेने हस्तक्षेप केला आहे, या सर्व बाबींचा उल्लेख मी ‘हू किल्ड करकरे ’या पुस्तकात केला आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. या पुस्तकात मी २६ / ११ च्या हल्ल्याबाबत करण्यात आलेल्या तपासावर जे सप्रमाण प्रश्न उपस्थित केले आहे. त्या प्रश्नांना खोडून काढण्यासाठी कुणीही पुढे यावे, असे खुले आव्हानही मुश्रीफ यांनी यावेळी दिले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांचेही यावेळी भाषण झाले़ (प्रतिनिधी)च्ज्या राजर्षी शाहंूनी पुरोगामी विचारांना पाठबळ दिले. त्यांच्या कार्यात ज्यांनी बॉम्ब पेरून आडवे येण्याचे काम केले, ज्यांनी नेहमीच शाहू महाराजांना त्रास दिला. च्अशा शक्तीच्या लोकांचे प्रतिनिधी कोल्हापुरात निवडून येतात कसे? अशी विचारणा करत कोळसे-पाटील यांनी शिवसेना-भाजपाकडे बोट दाखविले.