शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आंजर्ल्यात भरणार कासव महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 03:01 IST

सागरी कासवांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी आंजर्ला गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने समुद्र किनाऱ्यावरील कासवांची घरटी संरक्षित केली

मुंबई : मोठ्या प्रमाणावर होणारी मासेमारी, वाढणारे प्रदूषण, मांसासाठी होणारी कासवांची हत्या आणि कासवांच्या अंड्यांची चोरी अशा कारणांमुळे सागरी कासवांचे अस्तित्व जगभरात धोक्यात आले आहे. सागरी कासवांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी आंजर्ला गावातील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने समुद्र किनाऱ्यावरील कासवांची घरटी संरक्षित केली आहेत. कासव संरक्षण मोहिमेंतर्गत ४ ते ७ एप्रिल आणि १५ ते २३ एप्रिलदरम्यान कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दापोली तालुक्यात असलेले आंजर्ला गाव नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. आंजर्ला गावाला स्वच्छ सुंदर समुद्र किनारा लाभला असून, भरपूर निसर्गसंपन्नता आहे. यामुळे सागरी कासवांच्या संवर्धनासाठी ग्रामपंचायत आंजर्ले, कासव मित्रमंडळ आंजर्ले यांच्यातर्फे आणि वनविभाग रत्नागिरी, सह्याद्री निसर्ग मित्रच्या सहकार्याने केलेल्या कासव महोत्सवात, सकाळी ७ आणि सायंकाळी ६ वाजता कासवे समुद्रात सोडण्यात येणार आहेत. या महोत्सवात कासवांसंबंधित माहिती देण्यासाठी, तिथे कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत. कासवांबरोबरच कोकणातील निसर्गाची ओळख व्हावी, यासाठी निसर्गभ्रमंती, कांदळवनाची, तसेच पक्षांची माहिती कार्यकर्त्यांतर्फे पर्यटकांना देण्यात येणार आहे. सागरी कासव संवर्धनाचे हे काम गेली १४ वर्षे सातत्याने सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या कामातून १ हजारहून अधिक घरटी संरक्षित करण्यात येऊन, ४० हजारपेक्षा पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत. समुद्रात गेलेली पिल्ले मोठी होऊन, त्याच किनाऱ्यावर घरटे करण्यासाठी परत येतात. जवळपास १ हजार पिल्लांमधून केवळ १ पिल्लू वाचून मोठे होते. यावरून कासव संवर्धनाचे कार्य किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन स्थानिकही यात सहभागी होतात. (प्रतिनिधी)असा होतो कासवाचा जन्म!सागरी कासवे रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. किनाऱ्यावरील वाळूत मागच्या पायांनी खड्डा करतात. त्यात १०० ते १५० अंडी घालून खड्डा बुजवतात. त्यानंतर, समुद्राकडे परत जातात. कासवे परत गेल्यावर, कधीही आपल्या घरट्याकडे परत येत नाहीत. खड्ड्यात घातलेली ही अंडी नैसर्गिक उष्णतेने उबून ४५ ते ५५ दिवसांत पिल्ले बाहेर पडतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर ती ४ ते ५ दिवसांनी वाळूतून बाहेर पडून आपोआप समुद्रात जातात. >उपाध्ये व केळस्कर यांना कासवमित्र पुरस्कारसह्याद्री निसर्गमित्र यांच्या वतीने देण्यात येत असलेल्या कासवमित्र पुरस्कारासाठी वेळास येथील मोहन उपाध्ये व आंजर्ला येथील अभिनय केळस्कर यांची निवड करण्यात आली आहे. हे पुरस्कार ५ एप्रिल रोजी आंजर्ला येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत. रोख रुपये पाच हजार, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सह्याद्री निसर्गमित्रच्या वतीने सन २००२-०३ सालापासून सागरी कासव संरक्षण मोहिमेत यशस्वी कार्य करणाऱ्या व्यक्तींना कासवमित्र पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. आजपर्यंत नंदकुमार पाटील, वेळास (२००४), चारुहास टिपणीस व रत्नदुर्ग माउंटेनिअर्स, महाड (२००५), रामदास महाजन, कोळथरे (२००७), जयंत कानडे, मारळ (२००९) यांना पुरस्कार देण्यात आले आहेत.मोहन उपाध्ये हे मुंबई येथील नोकरी सोडून वेळासमध्ये परतले. तेथे सह्याद्रीचे कासवांचे काम पाहून त्यामध्ये सामील झाले. पुढे सातत्याने हे काम यशस्वी होण्यासाठी प्रयत्नात राहिले. वेळासमधील ग्रामस्थ्यांना बरोबर घेत विविध नवनवीन कल्पना अमलात आणल्या. वेळासबरोबर आजूबाजूच्या गावांत कासव संरक्षण यशस्वी केले. अभिनय केळस्कर यांनी २००६ साली आंजर्ले येथे सह्याद्रीच्या कासव संरक्षण मोहिमेत सहभाग घेतला. कामामध्ये सातत्य दाखवून आजूबाजूच्या गावातसुद्धा कासव संरक्षण यशस्वी केले. आंजर्ले येथे गेल्या वर्षीपासून कासव महोत्सवास सुरुवात केली.