शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैयाला विमानात धक्काबुक्की

By admin | Updated: April 25, 2016 08:10 IST

एका सहप्रवाशाने आपल्यावर हल्ला करून गळा दाबण्याचा प्रयत्न केला, असा दावा जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारने केला आहे.

मुंबई : मुंबईतून पुण्याकडे विमानाने जात असताना मानसज्योती डेक्का नावाच्या एका सहप्रवाशाने आपल्यावर हल्ला करून गळा दाबण्याचा प्रयत्न केला, असा दावा जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारने केला आहे. मात्र, जेट एअरवेज व मुंबई पोलिसांनी कन्हैयाचा हा दावा फेटाळत केवळ धक्का लागल्याने त्यांच्यात बाचाबाची झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मानसज्योती डेक्का या कोलकात्याच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. कन्हैया कुमारच्या सहकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सुमारे अडीच तास कन्हैयाला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबून राहावे लागले. शिवाय, नियोजित विमान प्रवास रद्द झाल्याने त्याने अखेर सहकाऱ्यासमवेत दुपारी मोटारीने पुण्याकडे प्रयाण केले. 

विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, लोकभारती पक्षाचे आमदार कपिल पाटील आदींच्या समवेत कन्हैया आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचला. धीरज भारत शर्मा व अन्य तिघा सहकार्‍यासमवेत तो जेट एअरवेजच्या (९व्हीआय-६१८) विमानात बसला. विमान उड्डाणास काही मिनिटांचा अवधी बाकी असताना, कन्हैयाच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या मानसज्योती नागेंद्र डेक्का (३३) या तरुणाबरोबर त्याचा वाद झाला. कन्हैयाच्या म्हणण्यानुसार, मानस ज्योतीने अंगावर येत गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे विमानातील सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याकडे धाव घेत त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. डेका यास विमानातून उतरविण्यात आले. त्या पाठोपाठ कन्हैया व त्याचे साथीदारही विमानातून खाली उतरले व घडला प्रकार त्यांनी विमानतळावरील पोलिसांना सांगितला.

कन्हैया व त्याच्या सहकार्‍यांची मानस ज्योती डेक्का या प्रवाशाबरोबर विमानात सीटवर बसल्यानंतर क्षुल्लक कारणावरून वादावादी झाल्याचे आतापर्यंत तपासातून स्पष्ट झाले आहे. याबाबत सर्वांचे जबाब नोंदविण्यात आले असून, डेक्काकडे कसून चौकशी केली आहे. त्याच्याकडून कोणतीही आक्षेपार्ह बाब पुढे आलेली नाही. याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला .- देवेन भारती (सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था)

कन्हैयाचा पब्लिसिटी स्टंट - डेक्कामी कोलकात्याहून कामानिमित्त पुण्यासाठी जात होतो. कन्हैया कोण आहे, हे मला माहीतही नाही. माझा त्याला चुकून धक्का लागला. मात्र, त्याने व त्याच्या सहकार्‍यांनी नाहक आरडाओरड करीत गोंधळ घातला. प्रसिद्धीसाठी त्याने हा स्टंट केला आहे. मी भाजपा, आरएसएसचा नव्हे किंवा कोणत्याही पक्षाशी माझा काही संबंध नाही. मीही त्याच्याविरुद्ध तक्रार देण्याचा विचार करीत आहे.- मानसज्योती डेक्का (कन्हैयाशी वाद झालेला सहप्रवासी)