शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘कन्हैया कुमारला मुंबईत प्रवेश नको’

By admin | Updated: April 22, 2016 03:51 IST

द्रेशद्रोहाचा आरोपी असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्हैया कुमारला मुंबईत २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्याला प्रवेश देऊ नये, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत.

मुंबई : द्रेशद्रोहाचा आरोपी असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्हैया कुमारला मुंबईत २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्याला प्रवेश देऊ नये, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. वरळी गावात २३ एप्रिलला होणाऱ्या मेळाव्यात कन्हैया कुमारने भाषण केल्यास सभा उधळून लावू, असा इशाराही संघटनांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला आहे.मेळाव्यादिवशी कशाप्रकारे आंदोलन करणार याबाबत सर्वच संघटनांनी गुप्तता पाळली आहे. मात्र कार्यक्रमाला विरोध नसून कन्हैया कुमारला विरोध असल्याची प्रतिक्रिया हिंदू गोवंश रक्षा समितीचे वैभव राऊत यांनी व्यक्त केली. राऊत म्हणाले की, कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. हिंदू धर्माविरोधात कन्हैया कुमारकडून जी वक्तव्ये करण्यात येत आहेत त्यामुळे येथील शांतता व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे. परिणामी दादर पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी देऊ नये, अन्यथा कार्यक्रमात कन्हैया कुमारला प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली आहे. या आंदोलनात हिंदू गोवंश रक्षा समितीसोबत हिंदू राष्ट्र जनजागरण समिती, हिंदू जनजागृती समिती, शिवकार्य प्रतिष्ठान, हिंदू राष्ट्र सेना, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनांसह माजी स्वातंत्र्यसैनिक सहभागी होणार आहेत.