शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

कन्हैय्या कुमारवर चप्पलफेक, बजरंग दलाचा कार्यकर्ता अटकेत

By admin | Updated: April 14, 2016 18:51 IST

कन्हैय्या कुमारने भाषणाला सुरुवात करुन काही वेळ होताच त्याच्यावर चप्पल भिरकावण्यात आली, पोलिसांनी चप्पल फेकणा-याला ताब्यात घेतलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
नागपूर, दि. १४ - डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नागपुरात आलेल्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर चप्पल फेकण्यात आली आहे. कन्हैय्या कुमार भाषण देत असताना त्याच्यावर चप्पल भिरकावण्यात आली. चप्पल फेकणारा नेमका कोण आहे याची माहिती मिळालेली नाही, मात्र बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
कार्यक्रम सुरु होण्याअगोदरदेखील कन्हैय्या कुमारविरोधात बजरंग दलाने 'भारत माता की जय' घोषणा देत कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना सभागृहातून बाहेर काढलं आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. मात्र कन्हैय्या कुमारने भाषणाला सुरुवात करुन काही वेळ होताच त्याच्यावर चप्पल भिरकावण्यात आली. पोलिसांनी चप्पल फेकणा-याला ताब्यात घेतलं आहे.   
 
दरमयान, नागपूरमध्ये आलेला कन्हैया कुमारची गाडी अडवण्याचा प्रयत्न गुरुवारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी या प्रकरणी बजरंग दलाच्या सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 'जय श्री  राम'च्या घोषणा देत निदर्शकांनी कन्हैयाची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. 
 
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या  जयंतीनिमित्त कन्हैया नागपूरमध्ये आला आहे. भारतमातेचे तुकडे करण्याची भाषा करुन देशाच्या शूर सैनिकांचा अपमान करणा-या कन्हैयाला काही स्वार्थी लोकांनी आज नागपूरमध्ये बोलवले आहे असा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला. 
 
(सर्व छायाचित्रे विशाल महाकाळकर)