शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

पतंगरावांचा खाऊ अन् उदयनराजेंचा झाला बाऊ..!

By admin | Updated: January 15, 2017 04:17 IST

‘सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला,’ ही ओळख इतिहासजमा करण्यासाठी चारही बाजूने विरोधकांची सशस्त्र फौज मोठ्या त्वेषाने तटबंदीवर तुटून पडलेली असतानाच, खुद्द गडावरच्या

- सचिन जवळकोटे

‘सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला,’ ही ओळख इतिहासजमा करण्यासाठी चारही बाजूने विरोधकांची सशस्त्र फौज मोठ्या त्वेषाने तटबंदीवर तुटून पडलेली असतानाच, खुद्द गडावरच्या राजेंनीच आतील कोठारात सुरुंग उडवायला सुरुवात केलीय. म्हणूनच की काय, थोरल्या बारामतीकरांच्या सोहळ््यात ‘पतंगरावांचा खाऊ अन् उदयनराजेंचा बाऊ,’ गाजला.गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीला जे काही दोन-तीन जोरदार हादरे बसलेत, त्या धक्क्यातून नेतेमंडळी सावरण्याची चिन्हे काही दिसेनात. पक्षाच्याच कृषी सभापतींविरोधात दाखल केलेला राष्ट्रवादीचा अविश्वास ठराव बहुमताअभावी बारगळला. सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असतानाही, पतंगरावांचे बंधू अन् कॉँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम नाकावर टिच्चून निवडून आले. ... अन् हीच भळभळती जखम कुरवाळत शरद पवारांनी चार दिवसांपूर्वी साताऱ्याच्या मेळाव्यात आपला विषाद प्रकट केला. कार्यकर्त्यांनी ‘पतंगरावांचा खाऊ’ खाल्ल्यामुळे विधानपरिषदेचा पराभव जिव्हारी लागल्याचे स्पष्ट करतानाच, ‘पक्षाच्या मुळावर उठलेल्यांना बाजूला सारा!’ असा आदेशही त्यांनी दिला. या मेळाव्यातील साऱ्या नेत्यांची भाषणे ऐकताना, ‘यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-भाजपा आपला विरोधक नसून, कट्टर शत्रू केवळ पक्षाचे खासदारच आहेत,’ असा साक्षात्कारही तमाम कार्यकर्त्यांना झाला. एवढा उदयनराजेंच्या ‘कार्यकर्तृत्वाचा बाऊ’ झालाय. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार अन् उदयनराजे यांच्यातील वैयक्तिक ईर्ष्येच्या वणव्यात अख्खा राष्ट्रवादी पक्ष होरपळून निघत असतानाच, बाहेरून यात तेल ओतण्याचे महत्तकार्य काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे हेही इमाने-इतबारे करताहेत. विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर चवताळलेले जयकुमार राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तुटून पडलेत. एके काळी रामराजे अन् दिवंगत आमदार चिमणराव कदम यांच्यातील कलगीतुरा उभ्या महाराष्ट्राने पाहिला होता. मात्र, त्याहीपेक्षा खालच्या पातळीवर रामराजे अन् जयकुमारांचे वाक्युद्ध गेलेय. उदयनराजेंच्या कॉलरवरून सुरू झालेली टीकाटिप्पणी, आता जयकुमारांच्या विजारीनंतर रामराजेंच्या नाड्यापर्यंत पोहोचलीय. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये एकूण ६२ जागांवर झेडपीची रणधुमाळी रंगतेय. खरे युद्ध राष्ट्रवादी अन् काँग्रेसमध्येच होणार असले, तरी महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जातीने साताऱ्यात लक्ष घातल्याने भाजपाचाही जोर वाढल्याचे जाणवू लागलेय. शिवसेनेचे पालकमंत्री विजय शिवतारे मात्र, नीरा नदी ओलांडून साताऱ्यात येण्याच्या मानसिकतेतच नसल्याने बावचळलेले अनेक शिवसैनिक ‘उद्धवा.. कोणता झेंडा घेऊ हाती?’ या विवंचनेत अडकलेत. अशातच सदाभाऊ खोतांना जिल्ह्याचे सहपालकमंत्री मिळाल्याने, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने काही मतदारसंघांत कामाला लागलेत. थोडक्यात, यंदाच्या झेडपीत चित्र वेगळे दिसण्याची दाट शक्यता बदलत्या वातावरणातून जाणवू लागलीय.उदयनराजेंचा स्वतंत्र ‘मराठा पक्ष’ अन् कार्यकर्त्यांचा दबाव..खासदार उदयनराजेंनी आता झेडपी निवडणुकीसाठी स्वतंत्र ‘राजधानी विकास आघाडी’ची घोषणा केलीय. त्यात शरद पवारांनी अशा नेत्यांना बाजूला करण्याची घोषणा केल्यानंतर, चंद्रकांत पाटलांनी उदयनराजेंना ‘भाजपा प्रवेशाचे आवतन’ दिलेय, तसेच पृथ्वीराज चव्हाण यांचाही राजेंना आतून पूर्ण पाठिंबा राहिलाय. त्यामुळे भविष्यात उदयनराजे ‘कमळ’ जवळ करणार की ‘हात’.. याची चर्चा सुरू झालीय, तसेच संपूर्ण राज्यात ‘मराठा क्रांती पक्ष’ नावाने स्वतंत्र पार्टी स्थापन्यासाठीही कार्यकर्त्यांकडून दबाव वाढू लागलाय. मात्र, ‘आपला राज ठाकरे होऊ नये!’ याची काळजी घेणारे हे राजे सध्यातरी शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकूनच ‘गनिमी कावा’ खेळताहेत... म्हणजे, पक्षात राहूनच पक्षातील ‘विरोधकांना कामाला लावण्याची व्यूहरचना’ आखताहेत.