शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

कांदिवली संघाची विजयी सलामी

By admin | Updated: May 11, 2017 02:39 IST

कांदिवली केंद्राने प्रतिष्ठेच्या २७व्या कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी देताना कलिना केंद्राचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांदिवली केंद्राने प्रतिष्ठेच्या २७व्या कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी देताना कलिना केंद्राचा ९ विकेट्सने धुव्वा उडवला. अन्य सामन्यात शिवाजी पार्क संघाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बाजी मारली. कांदिवली संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करताना, ‘ब’ गटातून शानदार विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कलिना संघाचा केवळ ८९ धावांमध्ये खुर्दा उडवून कांदिवलीने अर्धा सामना जिंकला. यानंतर, पहिल्या डावात कांदिवलीने १२४ धावांची मजल मारत ३५ धावांची निर्णायक आघाडी घेतली. दुसऱ्या डावात पुन्हा एकदा कलिनाची घसरगुंडी उडाली. आर. विजय (३/४८) आणि निशांत कदम (३/१९) यांच्या भेदक माऱ्यापुढे कलिनाचा डाव १४० धावांत संपुष्टात आला. या वेळी १०५ धावांचे लक्ष्य मिळालेल्या कांदिवलीने केवळ एक फलंदाज गमावून दणदणीत विजय मिळवला. शुभम छागने झळकावलेल्या आक्रमक ५९ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १ बाद १०९ धावा करून कांदिवलीने सहज बाजी मारली. दुसरीकडे झालेल्या सामन्यात मनल कावळेने जबरदस्त शतक झळकावताना शिवाजी पार्क संघाचा विजय साकारला. घाटकोपर केंद्राविरुद्ध झालेल्या लढतीच्या पहिल्या डावात शिवाजी पार्कने ९३ धावांच्या आघाडीच्या जोरावर बाजी मारली, तसेच या वेळी मनलने यंदाच्या स्पर्धेत पहिले शतक झळकावण्याचा मानही मिळवला. घाटकोपरचा पहिला डाव १५९ धावांत गुंडाळल्यानंतर शिवाजी पार्क संघाने आपला डाव ६ बाद २५२ धावांवर घोषित करून ९३ धावांची निर्णायक आघाडी घेतली. मनलने १४३ धावांची धमाकेदार खेळी करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.यानंतर, घाटकोपरने दुसऱ्या डावात चांगचा खेळ केला. फैझ खानच्या नाबाद ५३ धावांच्या जोरावर त्यांनी दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद १५७ धावांवर डाव घोषित केला. आयुष्य झिमरेने भेदक मारा करताना २१ धावांत ६ बळी घेत घाटकोपरचे कंबरडे मोडले. मात्र, पहिल्या डावातील आघाडी निर्णायक ठरवताना शिवाजी पार्कने अपेक्षित बाजी मारत आगेकूच केली.