शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

कामगाराला हाव नडली

By admin | Updated: August 12, 2015 03:23 IST

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील खासगी सफाई कामगाराच्या हाती दोन किलो सोने लागले. ते त्याने कस्टमकडे सोपविण्यास हवे होते, पण त्याला हाव सुटली.

मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील खासगी सफाई कामगाराच्या हाती दोन किलो सोने लागले. ते त्याने कस्टमकडे सोपविण्यास हवे होते, पण त्याला हाव सुटली. त्याने एक किलो सोने स्वत:साठी ठेवून घेतले आणि उरलेले एक किलो सोने प्रामाणिकपणाचा आव आणून कस्टमच्या एअर इंटेलिजन्स युनिटला दिले आणि ते बेवारस अवस्थेत सापडल्याची कहाणीही रचली. इतक्यात ज्याने सोने दिले होते, तो आला आणि त्याने भांडण सुरू केले. दोघांमधला संवाद ऐकून एआययूने दोघांना गजाआड केले आणि सोन्याची संभाव्य तस्करीही रोखली.मंगळवारी इरफान मोहम्मद शेख हा तरूण दुबई व्हाया कुवेत असा प्रवास करून मुंबई विमानतळावर उतरला. त्याने तब्बल २,०९९ ग्रॅम सोने आणले होते. मात्र विमानतळावरील बंदोबस्त व प्रवाशांची झाडाझडती पाहून तो घाबरला. भीतीपोटी त्याने अरायव्हल पॅसेजमधील शौचालय गाठले. तेथे विक्की प्रजापती साफसफाई करत होता. इरफानने आपल्याकडील दोन किलो सोने विक्कीकडे दिले. हे सोने विमानतळाबाहेर सुरक्षितपणे काढून दिल्यास ३० हजार रूपये देईन, असे आमीषही दाखवले. विक्की लगेच तयार झाला. युसूफ शौचालयातून बाहेर पडताच विक्कीला हाव सुटली. त्याने एक किलो सोने शौचालयातील कचरापेटीत दडवून ठेवले. शौचालय बंद करून उर्वरित सोने घेऊन त्याने तत्काळ एआययू अधिकाऱ्यांना गाठले. हे सोने मला शौचालयात बेवारस आढळल्याची थापही मारली. दुसरीकडे बराच वेळ झाला तरी विक्की येत नाही, हे पाहून इरफानने शोध सुरू केला. साध्या वेशातील एआययू अधिकाऱ्यांसोबत प्रक्रिया पूर्ण करण्यात व्यस्त असलेल्या विक्कीला इरफानने गाठले. त्याने सोन्याबाबत विचारपूस सुरू केली. दोघांमध्ये वादही झाला. एआययू अधिकाऱ्यांसमोरच वाद झाल्याने चोरी पकडली गेली. अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता विक्कीचा तस्करीतील सहभाग समोर आला.(प्रतिनिधी)विमानतळावरील शौचालयांच्या स्वच्छतेचे कंत्राट ए टू झेड कंपनीकडे आहे. विक्की याच कंपनीचा कर्मचारी आहे. पूर्वी याच कंपनीचे आणखी तीन कर्मचारी सोने तस्करीत गजाआड झालेले आहेत. विक्कीच्या अटकेनंतर एआययूने कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना कर्मचारी-कामगार नेमताना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती एआययूचे सहआयुक्त मिलिंद लांजेवार यांनी ‘लोकमत’ला दिली.चौथा कामगार अटकेतसोने कस्टमने पकडले असे सांगून विक्की इरफानला फसवणार होता. मात्र योगायोगाने सोन्यासह दोघेही आमच्या तावडीत सापडले, एआययूच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. इरफानने चौकशीदरम्यान हे सोने तस्करीतले नसून स्वत:साठी विकत घेतल्याचा दावा केला. मात्र इरफानची एकूण अवस्था पाहून त्याची दोन किलो सोने विकत घेण्याची ऐपत असावी, असे एआययूला जाणवले नाही. इरफान हा सोन्याचा कॅरिअर असावा, असाही संशय एआययूला आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे. इरफानने आपल्याकडील दोन किलो सोने विक्कीकडे दिले. हे सोने विमानतळाबाहेर सुरक्षितपणे काढून दिल्यास ३० हजार रूपये देईन, असे आमीषही दाखवले.