शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

काँग्रेसच्या सर्व पदांचा कामत यांचा राजीनामा

By admin | Updated: April 27, 2017 02:24 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी बुधवारी दुपारी अचानक काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी बुधवारी दुपारी अचानक काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तथापि, गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदावरून हटवल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.गुरुदास कामत यांना गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदावरून हटवून त्यांच्या जागी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने केलेल्या या पक्षांतर्गत फेरबदलावर कामत नाराज होते. गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याने या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत.काँग्रेससाठी कुठल्याही परिस्थितीत गुजरात जिंकणे, हेच सध्या ध्येय आहे. त्यासाठी काँग्रेसने गुजरातमध्ये संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कामत यांना हटवून त्यांच्या जागी गेहलोत यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. गुरुदास कामत गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज होते. यासंदर्भात त्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन नाराजी व्यक्तही केली होती. मुंबई पालिका निवडणुकीमध्येही उमेदवार ठरवण्यावरून त्यांचे तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्याबरोबर मतभेद झाले. तेव्हाही त्यांनी राजीनामा दिला. तेव्हा त्यांची समजूत काढली होती. (प्रतिनिधी)