शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणचा सोनसाखळी चोर कोट्यधीश

By admin | Updated: May 9, 2017 07:06 IST

ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कल्याणमधील सोनसाखळी चोराचे देशभरातील काही प्रमुख शहरांमध्ये रॅकेट असल्याची

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कल्याणमधील सोनसाखळी चोराचे देशभरातील काही प्रमुख शहरांमध्ये रॅकेट असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. या धंद्यातून त्याने मोठ्या प्रमाणात माया गोळा केली असून, त्याचे आंबिवलीत घर, दिल्लीत दोन बंगले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी या धनाढ्य सोनसाखळी चोरास एका फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती. तोतया पोलीस अधिकारी बनून फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या कल्याणनजीकच्या आंबिवली येथील नासिर खान याला दिल्ली पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केली होती. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) ठाण्यात गुन्हा दाखल असलेला नासिर हा ठाणे पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड आरोपींच्या यादीत होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षांचा नासिर जवळपास १५ ते २0 वर्षांपासून गुन्हेगारी जगताच्या संपर्कात आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याणसह दिल्ली, कोलकाता आणि हैदराबादसारख्या मोठ्या शहरांमध्येही त्याचे रॅकेट आहे. महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावणे हा त्याचा प्रमुख धंदा आहे. या धंद्यातून त्याने खूप मालमत्ता जमवल्याची माहितीही सूत्रांनी दिली. त्याच्या मालमत्तेच्या तपशिलाला पोलिसांनी अधिकृतपणे दुजोरा दिलेला नसला तरी त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तीन वर्षांपूर्वी नासिर याला ठाणे पोलिसांनी अटक केली होती, परंतु जामिनावर सुटल्यानंतर त्याने आपले बस्तान दिल्लीत हलवले. दिल्लीत एका रहिवाशाला फसवण्याचा प्रयत्न केला. मात्र या रहिवाशाच्या सतर्कतेमुळे तो दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात अडकला. नासिरला न्यायालयाने १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.