शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक स्मार्ट करणार

By admin | Updated: June 28, 2016 02:37 IST

कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटीच्या नव्या आराखड्यात वाहतूक व्यवस्था आमूलाग्र सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.

मुरलीधर भवार,

कल्याण- कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटीच्या नव्या आराखड्यात वाहतूक व्यवस्था आमूलाग्र सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. स्टेशन परिसरातील गर्दी कमी करून शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत नागरिकांनी केलेल्या सूचनांनुसार हा बदल करण्यात आला आहे. दोन हजार २७ कोटींचा हा सुधारित आराखडा गुरूवारी राज्य सरकारला सादर केला जाईल. पहिल्या फेरीतील आराखडा एक हजार ४४५ कोटींचा होता. चुका टाळून नव्याने तयार केलेला आराखडा परिपूर्ण असल्याने स्मार्ट सिटीच्या या फेरीत कल्याण-डोंबिवलीचा नक्कीच नंबर लागेल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रस्ताव केंद्राकडेचमहापालिकेने पहिल्या फेरीसाठी १५ डिसेंबर २०१५ ला आराखडा सादर केला होता. तेव्हा पालिकेचा ३८ वा नंबर लागला होता. दुसऱ्या फेरीचा आराखडा तयार करण्यापूर्वी पालिकेने स्मार्ट सिटी शिखर परिषद भरविली होती. राज्याकडून दहा स्मार्ट शहरे तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने हा प्रस्ताव केंद्राकडे सादर होणार की राज्याकडे असा संभ्रम निर्माण झाला. पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता तो केंद्र सरकारकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. >निधी मिळणार कुठून? : केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, खाजगी गुंतवणूकदार व परदेशी कंपन्यांकडून स्मार्ट सिटीसाठी निधीची उभारणी केली जाणार आहे. >मुंबई, ठाण्याचीही निवड नक्की : २०१७ मध्ये मुंबई, ठाणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्या दोन्ही शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड केली जाणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपला मतदारांनी चांगला कौल दिल्याने ही शहरेही स्मार्ट करण्याचे प्रयत्न केंद्र व राज्यातील भाजप सरकार करेल, अशी चिन्हे आहेत. >नागरिकांना हवंय तरी काय?स्टेशन परिसर मोकळा, विकसित हवा, वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक यंत्रणा सुसज्ज करणे याला प्रथम पसंती.घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबविण्यावर भर.ग्रीन पार्कचा मुद्दा आणि वॉटर फ्रंट-जल वाहतुकीचा क्रमांक त्यापुढचा.