शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण- डोंबिवलीचा कचरा उंबर्डेतच

By admin | Updated: April 21, 2015 01:35 IST

केडीएमसी प्रशासनाने तळोजा सामायिक भरावभूमी प्रकल्पात सहभागी होण्यासंदर्भातला दाखल केलेला प्रस्ताव दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे.

कल्याण : केडीएमसी प्रशासनाने तळोजा सामायिक भरावभूमी प्रकल्पात सहभागी होण्यासंदर्भातला दाखल केलेला प्रस्ताव दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या महासभेने उंबर्डे येथेच कचरा टाकला जाईल, या निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. जून २०१३ मध्ये झालेल्या या ठरावाची महिनाभरात अंमलबजावणी करण्याचे आदेश या वेळी देण्यात आले. दरम्यान, प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ महासभा तहकू ब करण्यात आली.घनकचऱ्यावर मुंबई उच्च न्यायालयाने केडीएमसीला फटकारल्यानंतर ३१ मार्च २०१५ च्या शासनपत्रानुसार तळोजा येथील सामायिक भरावभूमी प्रकल्पात सहभागी होण्यासंदर्भात निर्णय घेण्याकामी सोमवारच्या महासभेत प्रशासनाने प्रस्ताव ठेवला. याआधीही २० जून २०१३ झालेल्या महासभेत तळोज्याच्या प्रकल्पात सहभागी व्हायचे की स्वत: प्रकल्प राबवायचा, असे दोन पर्याय होते. यावर तळोजा येथील प्रकल्प खर्चिक असल्याने डम्पिंगसाठी राखीव असलेल्या उंबर्डे येथील आरक्षित जागेला महासभेने पसंती दिली होती. त्यामुळे सोमवारच्या महासभेत पुन्हा हा विषय चर्चेला येताच सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर चांगलीच झोड घेतली. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच आजची परिस्थिती ओढवल्याचा आरोप या वेळी केला. डम्पिंगप्रश्नी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी केली असता शासनाची भूमिका हीच माझी भूमिका असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त मधुकर अर्दड यांनी दिले. तळोजा खर्चिक असेल तर शासनाकडून अनुदान मागण्यात येईल, असेही ते म्हणाले. उंबर्डे येथे महिनाभरात अंमलबजावणी न झाल्यास आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणला जाईल, असाही या वेळी निर्णय घेण्यात आला. दरम्यान, उंबर्डेला डम्पिंग नेण्यास विरोध कायम असल्याचे स्थानिक नगरसेविका पुष्पा भोईर यांनी स्पष्ट केले असून अन्य आरक्षित जागांवरही कचरा टाका, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. परंतु, त्यांची मागणी विचारात घेण्यात आली नाही. (प्रतिनिधी)