शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण : नगरसेवकांवर केवळ जमावबंदी उल्लंघनाचे गुन्हे ,महापौरांना वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 04:02 IST

केडीएमसीतील सत्ताधारी नगरसेवकांनी घातलेल्या धिंगाण्याप्रकरणी प्रशासनाच्या तक्रारीवरून केवळ जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा बाजारपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा दाखल झाला.

कल्याण : केडीएमसीतील सत्ताधारी नगरसेवकांनी घातलेल्या धिंगाण्याप्रकरणी प्रशासनाच्या तक्रारीवरून केवळ जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा बाजारपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा दाखल झाला. आयुक्त कार्यालयातील खुर्च्यांची मोडतोड होऊनही सरकारी कामात अडथळा आणण्याच्या गुन्ह्याला बगल देण्यात आली आहे. ‘गोंधळी’ नगरसेवक सत्ताधारी असल्याने प्रशासनानेही सावध अशी ‘बोटचेपी’ भूमिका घेतल्याची चर्चा सुरू आहे.नगरसेवकपदी निवडून येऊन दोन वर्षे उलटूनही विकासकामांच्या फायली मंजूर होत नसल्याची ओरड करत केडीएमसीतील सत्ताधाºयांनी मंगळवारी आयुक्त पी. वेलरासू यांच्याविरोधात आंदोलन केले. यात नगरसेविकांची भूमिका महत्त्वाची होती. यात महापौर राजेंद्र देवळेकर, गटनेते रमेश जाधव, सभागृह नेते राजेश मोरे आणि स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे हे पदाधिकारीही सहभागी झाले होते. याप्रकरणी केडीएमसीचे मुख्य सुरक्षा अधिकारी सुहास खेर यांच्या तक्रारीवरून नगरसेविका छाया वाघमारे, रजनी मिरकुटे, वैजयंती गुजर-घोलप, मनीषा तारे, नीलिमा पाटील, प्रियंका भोईर, वीणा जाधव, गुलाब म्हात्रे, पूजा म्हात्रे, लाजवंती मढवी, सुशीला माळी, संगीता गायकवाड, प्रेमा म्हात्रे, आशालता बाबर, शकिला खान यांच्यासह सभापती रमेश म्हात्रे, गटनेते रमेश जाधव, सभागृह नेते राजेश मोरे, प्रकाश पेणकर, मोहन उगले, श्रेयस समेळ, दशरथ घाडीगावकर, गणेश कोट, सुधीर बासरे अशा २५ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आला.बेकायदा जमाव जमवणे, आंदोलन छेडण्यापूर्वी प्रशासनाला कोणतीही माहिती न देता तसेच परवानगी न घेणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. पण, सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल झालेला नाही.विशेष म्हणजे, या आंदोलनात महापौर देवळेकरदेखील सहभागी होते. जी नगरसेवकांची भावना आहे, ती माझीही असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. परंतु, गुन्हा दाखल करताना त्यांना ‘अभय’ देण्यात आले. हा सर्व प्रकार अतिरिक्त आयुक्त संजय घरत, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, जलअभियंता चंद्रकांत कोलते, लेखाधिकारी दिग्विजय चव्हाण, लघुलेखक यमगर, उपायुक्त नितीन नार्वेक र यांच्या समक्ष घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे या संबंधितांना साक्षीदार म्हणून भूमिका बजावावी लागणार आहे.नगरसेवकांना नोटीस बजावून पुढील कारवाईगुन्हा दाखल झालेल्या नगरसेवक तसेच पदाधिकाºयांना तत्काळ अटक होणार नाही. त्यांना प्रथम नोटीस बजावली जाईल आणि त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यानुसार, पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.नगरसेवकांनी जमावबंदीचा आदेश मोडला आहे, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आंदोलनानंतर आयुक्तांनी स्वत: नगरसेवकांशी चर्चा केली. त्या वेळी कोणताही गोंधळ झाला नाही, त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.दुजाभाव का करता?आम्ही नागरिकांच्या समस्यांवर साधी आयुक्तांची भेट मागितली असता त्यांनी दिली नव्हती. अखेर, दालनात घुसखोरी केली असता आमच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे याआधी दाखल झाले आहेत.मग, सत्ताधाºयांना वेगळा न्याय का? प्रशासन त्यांना घाबरते का, असे सवाल मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी उपस्थित केले आहेत. शिवसेनेतील अंतर्गत कुरघोडीतून महिलांना पुढे करून जो पुरुषार्थ दाखवण्यात आला आहे, तोही लांच्छनास्पद असल्याचे कदम म्हणाले.जसे घडले तशी तक्रार दिली : सकाळी आंदोलनाची घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल व्हायला रात्र उजाडली. त्यातही किरकोळ गुन्हे दाखल करून सत्ताधाºयांच्या बाबतीत सावध भूमिका घेतल्याचे प्रशासनाने दाखवून दिले आहे. यासंदर्भात तक्रार दाखल करणारे सुरक्षा अधिकारी खेर यांच्याशी संपर्क साधला असता जे घडले, त्यानुसार तक्रार दिल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.घटनास्थळी नसतानाही गुन्हाशिवसेनेच्या नगरसेवकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात नगरसेविका पूजा म्हात्रे यांचेही नाव आहे. परंतु, त्या घटनास्थळी नव्हत्या. तरीही त्यांचे नाव या प्रकरणात गोवल्याचा आरोप पूजा यांचे पती योगेश यांनी केला आहे.योगेश यांनी यासंदर्भात बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधला असता चौकशी करून त्यांचे नाव काढण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.