शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

कल्याण, भिवंडीला सतर्कतेचा इशारा

By admin | Updated: August 3, 2016 03:08 IST

सलग दोन दिवस सूर्यदर्शन न होता कोसळणाऱ्या पावसांना ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

टीम लोकमत,

ठाणे- सलग दोन दिवस सूर्यदर्शन न होता कोसळणाऱ्या पावसांना ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. भरतीच्या वेळी ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भाईंदरच्या अनेक भागांत, खाडीकिनारी पाणी शिरले. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक खोळंबली. भातसा धरण ८६ टक्के भरल्याने त्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. अजूनही संततधार पाऊस सुरू असल्याने कल्याण, भिवंडी, शहापूर तालुक्यातील नदीकाठच्या ४१ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असली तरी अद्याप कोठेही पूर आलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भातसा नदीतील पाणीपातळी वाढली आहे. उल्हास नदीसह जिल्ह्यातील अन्य नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. कल्याणचा गणेशघाट, गांधारी परिसर, डोंबिवलीचा रेतीबंदर परिसर, कोपर स्थानकालगतचा भाग, मुंब्रा येथील खाडीकिनारा, दिव्यातील खाजण जमिनीवरील घरांचा परिसर, कल्याणचा वालधुनीचा पट्टा, उल्हासनगरला खेमाणी नाल्याचा पट्टा, बदलापूरला चौपाटीचा परिसर, टिटवाळ््यात काळू नदीवरील रूंदे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. वासुंद्री येथे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. शिवाय रिजन्सीचा परिसर पाण्याखाली गेला. टिटवाळा मंदिर रोड परिसरातही पाणी आहे. भिवंडी-वाडा रस्त्यावरील शेलार नदीनाका येथे पावसाचे पाणी शिरले. शेती पाण्याखाली गेली. म्हारळ गाव परिसरात पाणी शिरले. धरणे पाण्याने भरत असली तरी अद्याप पुराचा धोका नाही, असा निर्वाळा जलसंपदा विभागाने दिला आहे. जिल्ह्यात मुसळधार वृष्टी सुरु राहिली आणि पुढील काळात धरणे पूर्ण क्षमतेने भरली, तरी पुरासारखी परिस्थिती उद्भवणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.भातसा ८६ टक्के भरले आहे. बारावी धरण ६६ टक्के भरले आहे. तानसा धरण १०० टक्के भरले आहे. जलसंपदा विभागाकडील ११ लघू पाटबंधारे तलावही पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. या तलावांच्या सांडव्यावरून पाणी वाहते आहे आणि आजूबाजूच्या शेती व परिसरात ते पसरत असल्याचे जलसंपदा विभागाने मान्य केले. मात्र हा विसर्ग खूपच कमी क्षमतेचा असल्याने त्यापासून कुठलाही धोका नसल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे. उल्हास नदीमध्ये आंध्र आणि बारवी धरणातून पाणी येते. या नदीतून वाहणाऱ्या पाण्याची धोक्याची पातळी मोहने, जांभूळ व बदलापूर बॅरेज येथे मोजली जाते. सध्या तरी ती धोकादायक पातळीपेक्षा खाली आहे. मात्र उल्हास नदीला येऊन मिळणाऱ्या पाण्याचा आणि त्या परिसरातील पावसाचा जोर जास्त राहिला, तरच पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते अशी माहिती लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ऊ. ल. पवार यांनी दिली. (प्रतिनिधी)41 गावे सतर्कतेचा इशारा दिलेली >शहापूर : साजीवली, सरलांबे, कासगांव, तुटे, कवडास, सापगांव, बामणे, कुटघर, अंताड, हिव, काजळविहीर, मोहोपाडा, कलमपाडा, भातसई, वाशिंद, साने, पालीभिवंडी : कमालवाडी, सोर, वावली, वांदे, अटकले, भादणे, चित्रपाडा, अजुनली, पिसे, देवरंग, बाबगांव, चोरडपाडा, कोने आणि जंडजरकल्याण : सारसे, कोलस, ओझरली, कोडरी, सांगोडी, मोंडे, टिटवाला, अटली, आंबिवली आणि वडवली