शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील कलाकारांचा ‘कल्पना’ महोत्सव

By admin | Updated: January 7, 2017 02:02 IST

दोन दिवसांच्या कला हस्तव्यवसाय महोत्सवाचे आयोजन मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात करण्यात आले आहे.

मुंबई : भारतातील बहुआयामी आणि विवधांगी कलाप्रकार आणि हस्तकलांची ओळख मुंबईकरांना करून देण्याच्या हेतूने टाटा ट्रस्टतर्फे प्रथमच ‘कल्पना’ या दोन दिवसांच्या कला हस्तव्यवसाय महोत्सवाचे आयोजन मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात करण्यात आले आहे. एरवी मुंबईसारख्या शहरी भागांना भारतातल्या अनेक कलाकार आणि कारागिरांच्या कामगिरीबाबत फारशी माहिती नसते. भारतासारख्या हजारो प्रकारच्या कला, हस्तव्यवसाय आणि परंपरांचा अंतर्भाव असलेल्या देशाची महती मुंबईकरांना व्हावी, हाच ‘कल्पना’ महोत्सवामागील उद्देश आहे. काळा घोडा येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयाच्या प्रांगणात ७ व ८ जानेवारी रोजी आयोजित महोत्सवात देशातील तीन ठिकाणचे कलाप्रकार आणि दहा ठिकाणच्या हस्तव्यवसाय कारागिरांची कामगिरी पाहायला मिळेल. याअंतर्गत बंगलोर येथील अट्टाक्कालरी सेंटर फॉर मूव्हमेंट आर्ट, भोपाळ येथील भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे देणारी धृपद संस्थान आणि कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील निनासम रंगभूमी समूहाचा समावेश असेल. हस्तव्यवसाय कलाप्रकारांमध्ये हातमाग, भरतकाम, चामड्याचे उद्योग, ढोक्रा धातू अशा विविध प्रकारांचा अनुभव मुंबईकरांना घेता येईल. (प्रतिनिधी)