शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘काळू-बाळू’ तमाशाला शासकीय निधी नाकारला!

By admin | Updated: May 24, 2015 02:11 IST

तीन वर्षांतून एकदा मिळणाऱ्या आठ लाखांच्या मदत निधीतून साडेतीनशे वर्षांची परंपरा असणाऱ्या कवलापूर (ता. मिरज) येथील काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळाला सरकारने डावलले आहे.

लाल फितीचा कारभार : पुणे जिल्ह्यातील सर्व फडांना निधी मंजूरसांगली : तमाशा कलेला प्रोत्साहन देण्यासाठी तीन वर्षांतून एकदा मिळणाऱ्या आठ लाखांच्या मदत निधीतून साडेतीनशे वर्षांची परंपरा असणाऱ्या कवलापूर (ता. मिरज) येथील काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळाला सरकारने डावलले आहे. काळू-बाळू यांची मुले सुनील, अरुण, कुंदन व पुतणे संपत खाडे यांनीच शनिवारी पत्रकार परिषदेत त्याचा गौप्यस्फोट केला.लहू ऊर्फ काळू आणि अंकुश ऊर्फ बाळू या शिवा-संभा कवलापूरकर यांचा वारसा चालवणाऱ्या जोडीने उभ्या महाराष्ट्राला पोट धरून हसविले. ते काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांची पाचवी पिढी आजही तमाशा टिकण्यासाठी धडपडत आहे.आमच्या फडाला शासनाचे सर्व पुरस्कार मिळाले आहेत. शासनाच्या लोककला महोत्सवात आम्ही सहभाग घेतो. मग आम्हाला डावलण्याचे कारण काय, असा सवाल त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. शासनाने २००९ पासून तीन वर्षांतून एकदा तमाशा मंडळाला आठ लाखांचा निधी देण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी आम्हाला निधी मिळाला. २०१२ मध्ये शासनाने कोणालाही निधी दिला नाही. आता २०१५ मध्ये राज्यातील विशेषत: पुणे जिल्ह्यातील सर्व तमाशा मंडळांना निधी मंजूर झाला आहे. २५ मे रोजी हा निधी दिला जाणार आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव काळू-बाळू तमाशा मंडळाला शासनाने निधीतून डावलले आहे, असे त्यांनी सांगितले.निधी मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावाही केला होता. मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने पुन्हा एकवेळ आमचा विचार करावा. अन्यथा आम्ही मंत्रालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा विचार करीत आहोत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी) गतवर्षी सांगोल्यातील सावकाराने कर्ज न दिल्याने तमाशाचा फड सुरू करण्यासाठी पैसे नव्हते. ऐन हंगामात तब्बल तीन महिने फड कवलापुरात बसून होता. गावकरी मदतीला धावले आणि पाच लाखांची वर्गणी गोळा झाली. त्यानंतर कवलापुरात सिद्धेश्वर मंदिराच्या पटांगणात श्रीगणेशा करून फड बाहेर पडला. यावर्षी शासनाचा आठ लाखांचा निधी मिळेल आणि हंगाम वेळेत सुरू करता येईल, या आशेवर फड अवलंबून होता.