शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

‘काळू-बाळू’च्या तमाशाला नवसाचं देणं !

By admin | Updated: April 18, 2016 01:24 IST

विनोदी भूमिका आणि अभिनयाने साऱ्या महाराष्ट्राला पोट धरुन हसायला लावणारा अंकुश ऊर्फ बाळू संभाजी खाडे व लहू ऊर्फ काळू संभाजी खाडे यांचा तमाशा यावर्षी दुष्काळामुळे बंद पडला.

- सचिन लाड,  सांगली

विनोदी भूमिका आणि अभिनयाने साऱ्या महाराष्ट्राला पोट धरुन हसायला लावणारा अंकुश ऊर्फ बाळू संभाजी खाडे व लहू ऊर्फ काळू संभाजी खाडे यांचा तमाशा यावर्षी दुष्काळामुळे बंद पडला. पण तमाशाची जन्मभूमी असलेल्या कवलापूर (ता. मिरज जि. सांगली) येथील श्री सिद्धेश्वर देवाच्या यात्रेत त्यांची हलगी पुन्हा कडाडणार आहे. यात्रा समितीच्या पुढाकारामुळे बंद पडलेल्या या तमाशाला नवसाचं देणं लाभलं आहे.तमाशाचा सर्व खर्च यात्रा समितीने उचलला आहे. त्यानुसार कलाकारांची जुळवाजुळव व तमाशाची रंगीत तालीमही सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटामुळे हा तमाशा अडचणीत आहे. विजयादशमीला हा फड बाहेर पडतो. तेथून मे महिन्यात अक्षय्यतृतीयेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर सुमारे सव्वादोनशे प्रयोग केले जातात. पण यंदा दुष्काळामुळे तमाशा चालणार नाही, असा विचार करुन फड बंद ठेवला आहे. मात्र सिद्धेश्वर मंदिरात देवासाठी नवसाचा खेळ करण्याच्या निमित्ताने तमाशा पुन्हा कवलापूरच्या मातीत बहरणार आहे. कवलापूर यात्रा समितीने ‘काळू-बाळू’ तमाशाचे संचालक संपत खाडे यांची भेट घेतली. यात्रेत तमाशाचा खेळ करण्याची विनंती करत खर्चाची सर्व जबाबदारी उचलली. कलाकारांचा पगार, जेवण, जनरेटरची व्यवस्था यात्रा समिती करणार आहे. दुष्काळामुळे यंदा तमाशा सुरू ठेवणे परवडणारे नसल्याने फड बंद ठेवला. कवलापूर यात्रेत आमचा नवसाचा खेळ असतो. ही परंपरा खंडित होते की काय, अशी भीती होती. पण यात्रा समिती मदतीला धावली. त्यामुळे आम्ही केवळ यात्रेपुरते दोन दिवस खेळ करणार आहोत. - संपत खाडे, संचालक, काळू-बाळू लोकनाट्य तमाशा