मुंबई : घनश्याम भतिजा हत्येप्रकरणी माजी आमदार सुरेश ऊर्फ पप्पू कलानीला ठाणे न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम केली़या शिक्षेविरोधात कलानी यांनी याचिका दाखल केली होती़ त्यात ही शिक्षा रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली होती़ मात्र ठाणे न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यासारखे काही आक्षेपार्ह नसल्याचे मत व्यक्त करीत न्या़ सत्यरंजन धर्माधिकारी व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने कलानी यांची याचिका फेटाळून लावली़ सुमारे २३ वर्षांपूर्वी २७ फेब्रुवारीला भतिजा यांची हत्या झाली़ या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार भतिजा यांचा भाऊ इंदर यांचीदेखील काही दिवसांनी हत्या झाली़ राजकीय वैरातून भतिजा यांची हत्या झाल्याचा पोलिसांचा आरोप होता़ कलानीसह पाच जणांविरुद्ध याचा खटला चालला़ गेल्या वर्षी ठाणे न्यायालयाने कलानी व इतर दोन आरोपींना शिक्षा ठोठावली होती.
कलानीची जन्मठेप कायम
By admin | Updated: October 15, 2014 02:11 IST