शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

केकाटलाच नाय डीजे.. जनतेची शपथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2016 23:45 IST

डॉल्बी पुन्हा अडगळीतच : ‘लोकमत’ची मोहीम सातारकरांनी बनविली लोकचळवळ--आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !

सातारा : ‘लोकमत’ने सुरू केलेल्या डॉल्बीमुक्ती मोहिमेला प्रतिसाद देत सातारकरांनी यंदा डॉल्बी हद्दपार केली. झांजपथक, हलगी, ढोलपथक, कोकणी वाद्यांसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक पार पडली.पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, ही भूमिका घेऊन ‘लोकमत’ने गेल्या महिनाभरापासून ‘आव्वाज गावाचा न्याय डॉल्बीचा’ या आशयाखाली जनजागृती केली. त्याला जिल्ह्यातून आणि सातारा शहरातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. डॉल्बीसंदर्भात पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत कठोर कारवाई करण्याचा निर्धार केला. त्यामुळे ही मोहीम खऱ्या अर्थाने फत्ते झाली.गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये दोन डॉल्बी व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यंदा डॉल्बी व्यावसायिक आणि गणेश मंडळांनी ‘लोकमत’च्या मोहिमेला प्रतिसाद देत डॉल्बी कोनाड्यात ठेवून देणे पसंत केले.यंदा शंभर टक्के डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक पार पडल्याने अनेक नागरिकांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयात फोन करून ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.ऐतिहासिक जिवंत देखाव्यांसह हलगी, नाशिक ढोल, झांजपथक, बँजो, डिजिटल बँजो, लेझीम पथक, दांडपट्टा असे पारंपरिक खेळ आणि वाद्य यंदा विसर्जन मिरवणुकीमध्ये सातारकरांना पाहावयास मिळाली. (प्रतिनिधी)तब्बल सोळा तास मिरवणूक !काही सार्वजनिक मंडळांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता विसर्जन मिरवणुकीस सुरुवात केली. रात्री बाराला पोलिसांनी पारंपरिक वाद्य वाजविण्यास अटकाव केल्यानंतरही काही मंडळांनी विसर्जन मिरवणूक सुरूच ठेवली होती. पहाटे तीन वाजता दोन सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जनस्थळी पोहोचली होती. मात्र, यावेळी क्रेन नादुरुस्त झाली. त्यामुळे बराचवेळ गणेशमंडळांना वाट पाहावी लागली. सकाळी आठ वाजता क्रेन दुरुस्त झाल्यानंतर दोन्ही मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.विसर्जन मिरवणुकीत वादावादीयेथील कन्याशाळेसमोर दोन सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र आली. पुढे-मागे जाण्यावरून त्यांच्यात वाद झाला. एकमेकांना मारहाण सुरू झाल्यानंतर गणेशभक्तांमध्ये धावाधाव सुरू झाली. सुमारे पाच मिनिटे ही वादावादी सुरू होती. त्यानंतर आपापसात तोडगा काढून ही मंडळे मार्गक्रम झाली. पोलिस येईपर्यंत हा वाद मिटला होता.विसर्जन मिरवणुकीत वादावादीयेथील कन्याशाळेसमोर दोन सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र आली. पुढे-मागे जाण्यावरून त्यांच्यात वाद झाला. एकमेकांना मारहाण सुरू झाल्यानंतर गणेशभक्तांमध्ये धावाधाव सुरू झाली. सुमारे पाच मिनिटे ही वादावादी सुरू होती. त्यानंतर आपापसात तोडगा काढून ही मंडळे मार्गक्रम झाली. पोलिस येईपर्यंत हा वाद मिटला होता.सातारा : ‘डॉल्बी संस्कृतीने निर्माण झालेल्या गंभीर समस्येवर आवाज उठविण्याचे धाडस केवळ ‘लोकमत’ने दाखविल्यानेच साताऱ्यातील गणेशोत्सव डॉल्बीमुक्त अनुभवाला मिळाला़साताऱ्याच्या भूमीत अशक्य वाटणारी ही घटना केवळ ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळेच झाली,’ अशा भावना गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केल्या.काटेकर यांनी पुढे म्हटले आहे, सामाजिकतेची जाणीव ठेवून अखंडपणे वाटचाल करणाऱ्या ‘लोकमत’ने अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांना दिशा दिली आहे. डॉल्बीमुक्तीचा संदेश देत साताऱ्याच्या ऐताहासिक भूमीत ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन, प्रबोधनात्मक कार्यातून चमत्कार घडविला. आधुनिकतेच्या नावाखाली तरुणाईमध्ये वाढलेली चंगळवादी प्रवृत्तीने सार्वजनिक गणेशोत्सवाला गालबोट लागत होते़ तरुणाईमध्ये वाढलेल्या प्रवृत्तीवर प्रहार करताना सातत्याने प्रशासकीय यंत्रेणा व सातारकरांना सोबत घेऊन व्यापक चळवळ उभारली. ‘लोकमत’ने केलेल्या प्रबोधनामुळे डॉल्बीच्या दुष्परिणामाची माहिती समाजाच्या सर्वच स्तरापर्यंत पोहोचली. आणि पाहता-पाहता या चळवळीचे रूपांतर लोकचळवळीत झाले़ हा इतिहास ‘लोकमत टीम’ने रचला़ ’ असेही काटेकर यांनी सांगितले.डॉल्बी लावण्यापूर्र्वीच यंत्रणा ताब्यात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी शहरातील दोन मंडळांनी डॉल्बी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन दोन्ही डॉल्बी पोवई नाक्यावरून ताब्यात घेतल्या. विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर संबंधितावर प्रतिबंधात्मक कारवाई करून डॉल्बी त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या.