शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: April 11, 2016 03:06 IST

वालधुनी नदीला प्रदूषित करणाऱ्या जीन्स कारखान्यांना जिल्हास्तरीय दबंग नेत्याचा आशिर्वाद मिळाल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे

उल्हासनगर : वालधुनी नदीला प्रदूषित करणाऱ्या जीन्स कारखान्यांना जिल्हास्तरीय दबंग नेत्याचा आशिर्वाद मिळाल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पालिकेने नोटीस पाठविण्या पलिकडे कोणतीही कारवाई केली नसल्याचे उघड झाले. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिलेल्या आदेशाला पालिकेने केराची टोपली दाखविली आहे. उल्हासनगरातील कॅम्प नंबर ४ व ५ भागात ५०० पेक्षा अधिक जीन्स कारखाने आहेत. कारखान्यातील सांडपाणी थेट सोडत असल्याने उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. हरित लवादाने उल्हास नदीसह वालधूनीला प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच उल्हासनगर पालिकेसह कल्याण-डोंबिवली व अंबरनाथ पालिकेला नोटीस बजावत कोटयावधीचा दंड थोठावला होता. पालिकेने राजकीय नेत्याच्या मदतीने सरकारला साकडे घालून उल्हास नदीला प्रदूषित करणाऱ्या खेमाणी नाल्याचा प्रवाह बदण्याचे काम सुरू केले. पर्यावरण मंत्री कदम यांनी वालधूनी व उल्हास नदी प्रदूूषणाबाबत पालिका आयुक्त मनोहर हिरे, शहर अभियंता कलई सेलवण, प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक गेल्या महिन्यात बोलाविली होती. शहरातील शेकडो बेकायदा जीन्स कारखाने सांडपाणी थेट वालधूनी नदीत सोडत आहेत. त्यामुळे नदी प्रदूषित झाल्याचे सांगून दहा दिवसात कारवाई करून अहवाल पाठविण्याचे आदेश कदम यांनी बैठकीत दिले होते. पालिकेने मात्र नोटीसी पलिकडे काहीही कारवाई केली नसल्याचे उघड झाले आहे. (प्रतिनिधी)शहरातील भीषण पाणीटंचाईची झळ जीन्स कारखान्याला बसली नसल्याचे चित्र शहरात आहे. बहुंताश कारखान्यांकडे बेकायदा नळजोडणी असून कारखान्यात बोअरवेल खोदण्यात आल्या आहेत. यावर पालिकेचे नियंत्रण नसल्याने अमर्याद भूगर्भातून पाण्याचा उपसा होत आहे. स्थानिक राजकीय नेत्याचा हस्तक्षेप प्रमाणापेक्षा जास्त असल्याने पालिका या नळजोडण्या तोडण्याची करण्याची कारवाई करीत नाही. कारखाने होणार सील महापालिकेने ११० जीन्स कारखान्यांना कारवाई का करू नये? अशा नोटीसा दोन महिन्यांपूर्वी दिल्या आहेत. तसेच परवान्यासह इतर कागदपत्रे सादर करण्याचे बजावले आहे. मात्र कारखान्यांनी नोटीसीला केराची टोपली दाखविल्याने आयुक्तांनी पुढील आठवडयात कारखाने सील करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच कारवाई टाळायची असेल तर त्यांनी स्वखर्चाने सांडपाणी प्रक्रीया केंद्र उभारण्याचे आवाहन केले.