शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

कदम यांच्या टायपिस्टने घेतले ५० हजार

By admin | Updated: May 9, 2017 02:37 IST

अमरावतीच्या वाळू ठेकेदाराकडून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा टायपिस्ट

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमरावतीच्या वाळू ठेकेदाराकडून १० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा टायपिस्ट महेश सावंतला (४६) मलबार हिल पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याने यापूर्वी तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारल्याचे उघड झाले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते यांच्या मलबार येथील शासकीय निवासस्थानातून सावंतने अमरावतीच्या वाळू ठेकेदाराला कॉल केला. त्यानंतर कदमांच्या नावाचा वापर करत १० लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्यवसाय बंद करण्याची धमकी दिली होती. सावंतच्या सांगण्यावरुन या प्रकरणातील फरार आरोपीने तक्रारदाराकडून ५० हजार घेतल्याची माहिती तपासात समोर आली. सावंत उर्वरित रकमेसाठी सतावत असल्याने तक्रारदाराने कदम यांच्या पीएच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर कदम यांच्या आदेशाने मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले.