शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कचोरे टेकडी दरडींच्या छायेखाली

By admin | Updated: September 20, 2016 03:58 IST

पूर्वेतील कचोरे येथे रविवारी दुपारी १ च्या सुमारास दरड कोसळली असतानाच मध्यरात्रीही तेथे पुन्हा दरड कोसळली.

कल्याण : पूर्वेतील कचोरे येथे रविवारी दुपारी १ च्या सुमारास दरड कोसळली असतानाच मध्यरात्रीही तेथे पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे तेथे दरडींचा धोका कायम आहे. येथील कुटुंबांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था एका मंदिरात करण्यात आली आहे. टेकडीच्या पायथ्याशी राहणाऱ्या रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. कचोरे टेकडी येथे रविवारी भलेमोठे दगड घरंगळत खाली कोसळले. ते एका घराजवळ येऊन थांबल्याने तेथील घर आणि त्यातील कुटुंब बचावले. कचोरे टेकडीवर आणि पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर कुटुंबांचे वास्तव्य आहे. त्यात १७० कुष्ठरुग्णांची कुटुंबे आहेत. दरड कोसळल्याची घटना कळताच स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ‘ड’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी शांतिलाल राठोड आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांही या जागेची पाहणी केली. दुपारच्या घटनेनंतर रात्री पुन्हा दरड कोसळली. यातही कोणालाही दुखापत अथवा वित्तहानी झाली नाही. दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता तेथील कुटुंबांना घरे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही कुटुंबांचे अन्यत्र सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने यासंदर्भात स्थानिक नगरसेविका चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता दरडी कोसळण्याचा धोका पाहता तेथे संरक्षक जाळ्या बसवण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर झाला आहे. लवकरच या जाळ्या लावल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. >दोन वर्षांपूर्वी दरड कोसळून तेथे एकाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून येथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी होत आहे. परंतु, आजतागायत याची अंमलबजावणी झालेली नाही. रविवारी पुन्हा दरड कोसळल्याने रहिवाशांच्या जीवाला धोका कायम आहे. त्यामुळे आतातरी पुनर्वसनासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.- प्रदीप गायकवाड, अध्यक्ष, हनुमाननगर कुष्ठपीडित संघटना >पुनर्वसन हाच उपाय दरडी कोसळण्याच्या धर्तीवर संरक्षक जाळ्या लावण्यात येणार असल्या तरी तेथील रहिवाशांचे कायमस्वरूपी तेथून स्थलांतर करून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. पुनर्वसन हाच उपाय आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. लवकरच यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल. - राजेंद्र देवळेकर, महापौर, केडीएमसी