शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कैद्याची आत्महत्येला नैराश्याची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:23 IST

ऐन तारुण्यात बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात जाण्याचा प्रसंग आणि वर्षभरापासून जामीन मिळत नसल्याने, आलेल्या नैराश्यातून २२ वर्षीय कैद्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहात शनिवारी उशिरा रात्री गळफास घेतल्याची माहिती

ठाणे : ऐन तारुण्यात बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात जाण्याचा प्रसंग आणि वर्षभरापासून जामीन मिळत नसल्याने, आलेल्या नैराश्यातून २२ वर्षीय कैद्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहात शनिवारी उशिरा रात्री गळफास घेतल्याची माहिती आता समोर येत आहे.पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील डोंगरीपाड्याचा रहिवासी आशिष बरनवाल याच्यासह सहा आरोपींविरुद्ध एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा, वसई तालुक्यातील वाळुंज पोलीस ठाण्यात दाखल होता.१९ जुलै २०१६ रोजी आशिषला पोलिसांनी अटक केली,तेव्हापासून तो ठाणे मध्यवर्ती कारागृहात होता. या गुन्ह्यातील आशिषचे आणखी चार सहआरोपी याच कारागृहात होते.नेहमीप्रमाणे शुक्रवारी कारागृहातील कैद्यांना चित्रपट दाखविण्यात आला. चित्रपट संपल्यानंतर रात्री उशिरा कारागृहातील एका कोपºयामध्ये असलेल्या शौचालयामध्ये आशिषने टीशर्टच्या सहाय्याने गळफास घेतला. कारागृहात सर्वत्र सीसी कॅमेरे लावण्यात आले आहेत, परंतु मानवाधिकारी आयोगाच्या नियमानुसार शौचालयांमध्ये सीसी कॅमेरे लावता येत नाही, असे तुरुंग अधीक्षक नितीन वायचाळ यांनी सांगितले.आशिषला वडील नाहीत. आई आणि चुलतभाऊ त्याच्या जामिनासाठी वर्षभरापासून प्रयत्न करीत आहेत. जो गुन्हा आपण केलाच नाही, त्यासाठी शिक्षा भोगावी लागत असल्याची खंत त्याने अनेकदा सहआरोपींजवळ व्यक्त केल्याची माहिती आता समोर येत आहे. बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना पॅरोलही मिळत नाही. त्यामुळे वर्षभरापासून गजाआड असलेल्या आशिषचे मानसिक खच्चीकरणझाले होते, असे त्याच्या सहआरोपींच्या प्राथमिक जबाबातून समोर येत आहे.बलात्काराच्या या गुन्ह्यातील एका आरोपीला पीडित मुलीने ओळख परेडमध्ये ओळखले नव्हते. त्यामुळे त्याची सुटका झाली होती. उर्वरित आरोपींना अटक करण्यात आली होती.दरम्यान, आशिषच्या मृतदेहाचा पंचनामा न्यायदंडाधिकाºयांसमोर करण्यात आला. कारागृहातील सर्व सीसी कॅमेºयांचे फुटेज तपासणे आणि सहआरोपींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नितीन वायचाळ यांनी दिली. ठाणेनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.