शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. गायकवाडांच्या नियुक्तीचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 04:19 IST

मराठा समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात १६ टक्के आरक्षण देण्यासाठी सरकारने जमविलेल्या माहितीची छाननी करून विश्लेषण करण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने मागासवर्ग आयोगाकडे सोपवली आहे

मुंबई : मराठा समाजाला सरकारी नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात १६ टक्के आरक्षण देण्यासाठी सरकारने जमविलेल्या माहितीची छाननी करून विश्लेषण करण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने मागासवर्ग आयोगाकडे सोपवली आहे. मात्र या आयोगाचे अध्यक्ष व उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. बी. म्हसे यांचे काहीच दिवसांपूर्वी आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांच्या जागी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांचे नाव विचाराधीन असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला बुधवारी दिली.मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागेपर्यंत सरकारी नोकºयांमध्ये खुल्या प्रर्वगातून भरण्यात आलेल्या पदांना मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी सरकारने उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने सरकारची विनंती मान्यही केली.यावेळी सरकारी वकिलांनी मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व उच्च न्यायालायचे माजी न्यायाधीश संभाजी बाबुराव म्हसे यांचे निधन झाल्याची माहिती न्यायालयाला दिली. अध्यक्षपद रिक्त असल्याने आयोगाचे कामकाज सुरु होण्याच काहीसा विलंब होईल. म्हसे यांच्या जागी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या नावाचा सरकार विचार करत आहे. यासंदर्भातील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली. निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड हे अनेक आयोगांचे अध्यक्ष होते. पुण्यातील मावळ गोळीबार प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशी आयोगाचे अध्यक्ष होते.