शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

..तर बस वाहतूक बंद करा - हायकोर्ट

By admin | Updated: June 11, 2014 00:07 IST

बसमधील आपातकालीन खिडकी अपघातजन्य परिस्थितीत प्रवाशांना बाहेर पडण्या योग्य नसल्यास अशा बसची सेवा तात्काळ बंद करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले़

आपतकालीन खिडकी सुस्थितीत नसलेल्या बस तात्काळ बंद कराहायकोर्टाचे आदेश: ठिकठिकाणी तपासणी करामुंबई : बसमधील आपातकालीन खिडकी अपघातजन्य परिस्थितीत प्रवाशांना बाहेर पडण्या योग्य नसल्यास अशा बसची सेवा तात्काळ बंद करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले़न्या़ अभय ओक व न्या़ अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ बसमध्ये आपातकालीन खिडकी आहे की नाही तसेच एखादा प्रसंग ओढावल्यास प्रवासी त्यातून सुखरूप बाहेर पडू शकतात का हे केवळ चेकनाक्यांवर न तपासता ठिकठिकाणी याची तपासणी करावी़ या तपासणीत आपातकालीन खिडकी सुस्थितीत नसलेल्या बसची वाहतूक तात्काळ बंद करावी व या अटीची पूर्तता होईपर्यंत ती बस बंद ठेवा, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे़आपातकालीन खिडकी प्रवासी बाहेर पडण्याच्या स्थितीत नसल्याने काही दिवसांपूर्वी प्रवाशांचा बसला लागलेल्या आगती होरपळून मृत्यू झाला होता़ याची दखल घेत न्यायालय म्हणाले, अधिक प्रवासी घेण्याच्या स्वार्थामुळे आपातकालीन खिडकीजवळही प्रवासी बसलेले असतात़ याने अपघातजन्य परिस्थितीत प्रवाशांना तात्काळ बसबाहेर पडता येत नाही़ हे टाळण्यासाठी प्रत्येक बसमधील आपातकालीन खिडकी सुस्थितीत असणे आवश्यक आहे़याप्रकरणी पुणे येथील श्रीकांत कर्वे यांनी जनहित याचिका केली आहे़ वाहनांना न तपासताच फिटनेस सर्टिफीकेट दिले जाते़ हे वाढत्या अपघाताचे मूळ कारण असून याप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी कर्वे यांनी याचिकेत केली आहे़ त्यात न्यायालयाने वरील आदेश दिले़ यासह एआरआयए या केंद्रीय संस्थेने आरटीओंना कोणतीही पूर्वकल्पना न देता भेट द्यावी व तेथे वाहनांची तपासणी केली जाते का हे तपासून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे निर्देशही खंडपीठाने दिले़तसेच वाहन नीट तपासल्याशिवाय फिटनेस सर्टिफीकेट जारी करू नये व यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक निरीक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत़ यासह सर्व आरटीओंना वाहनांची चाचणी करण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्र द्यावीत, सर्व आरटीओ संगणकाने जोडावीत व मुंबईप्रमाणे ऑनलाईन लर्निंग लायन्स सुविधा सर्व आरटीओंमध्ये सुरू करावी, असे आदेशही न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत़(प्रतिनिधी)