शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत केवळ १३० प्राण्यांची वाढ

By admin | Updated: September 9, 2015 00:57 IST

दर वर्षाच्या बुद्ध पौर्णिमेला जंगलात प्राण्यांची जनगणना केली जाते. यात मानवी वस्त्यांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील काही प्राण्यांच्या आकडेवारीत घट होत असल्याचे समोर येत आहे.

- नामदेव पाषाणकर,  घोडबंदरदर वर्षाच्या बुद्ध पौर्णिमेला जंगलात प्राण्यांची जनगणना केली जाते. यात मानवी वस्त्यांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील काही प्राण्यांच्या आकडेवारीत घट होत असल्याचे समोर येत आहे. येऊर परिसरात २०१० मध्ये एकूण २५८ प्राण्यांची मोजदाद झाली होती. २०१५ मध्ये हा आकडा ३८८ वर पोहचला आहे. या पाच वर्षात प्राण्यांची संख्या १३० ने वाढली. मात्र वानर,भेकर,ससे यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे.येऊर परिसर जवळपास १५ हजार एकर जागेत विस्तारला आहे. यामध्ये पाचपाखाडी, कावेसर, मानपाडा, ओवळा, घोडबंदर, चेना, काशी, ससुनघर, नागला, सारजामोरी हा विभाग येत आहे. नैसिर्गक असलेल्या १५ पाणवठ्यांवर आणि ज्या जागेवर प्राणी येण्याची शक्यता असते तिथे पहारा देऊन वन कर्मचारी त्यांची गणती करतात. ती करताना सर्वच प्राणी त्या रात्री आढळतात, असे नाही. त्यामुळेच प्राप्त झालेल्या आकडेवारीत बराचसा फरक आढळत आहे. २०१० मध्ये वानर १०१, ससे २४, माकडे ४८, रानडुकर १६, सांबर १५, भेकर १३, मोर १५, उदमांजर १, रानमांजर १, बिबटे १० असे एकूण ३८८ प्राणी दिसून आले होते.2013-14 या आर्थिक वर्षात सस्तन प्राणी ४३, सरपटणारे प्राणी ३८, उभयचर प्राणी ९, पक्षी २५० असे एकूण ३४० प्राणी आढळले होते. २०१५ मध्ये झालेल्या गणनेत बिबटे २, वानर ६२, माकड १७१ , रानडुक्कर १५ सांबर १५, ,भेकर ३,मोर १, उदमांजर २, रानकोंबडी २९ ,रानमांजर ३,वटवाघुळ ३८, मुंगुस २२, चितळ २१, कोल्हे २, सर्प गरु ड २ अशा एकूण ३८८ प्राण्यांची आकडेवारी नोंद आहे. २०१५ च्या या गणनेत बिबटे कमी असल्याचे आढळले असले तरी ते कमी झाले नसून त्यांची संख्या वाढली असल्याचे वन अधिकारी संजय वाघमोडे यांनी सांगितले. उद्यानात जवळपास ५० च्या आसपास बिबटे असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.