शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत बस घुसली; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 21:39 IST

सहा जखमी; संतप्त जमावाने बस पेटविली, पोलिसांचा सौम्य लाठीमार, बसचा ब्रेक निकामी झालाकोल्हापूर : कोल्हापुरातील गंगावेश परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस (कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) घुसल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन भाविक ठार झाले; तर सहाजण गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने केएमटी बसची ...

ठळक मुद्देसहा जखमी; संतप्त जमावाने बस पेटविली, पोलिसांचा सौम्य लाठीमार, बसचा ब्रेक निकामी झाला

सहा जखमी; संतप्त जमावाने बस पेटविली, पोलिसांचा सौम्य लाठीमार, बसचा ब्रेक निकामी झालाकोल्हापूर : कोल्हापुरातील गंगावेश परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस (कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) घुसल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन भाविक ठार झाले; तर सहाजण गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने केएमटी बसची तोडफोड करून ती पेटविली, तर अग्निशामकच्या दोन गाड्यांचीही मोडतोड केली. संतप्त जमावाला रोखणे पोलिसांना अवघड झाल्याने जलद कृती दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या. बसचा ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.तानाजी भाऊ साठे (वय ५०), सुजल भानुदास अवघडे (१५, रा. राजारामपुरी तिसरी गल्ली, मातंग वसाहत, कोल्हापूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये अमर रामा कवाळे, स्वप्निल सुनील साठे, सचिन दत्ता साठे, आकाश तानाजी साठे, संदीप तानाजी साठे, साहील घाटगे (सर्व रा. राजारामपुरी, कोल्हापूर) यांचा समावेश आहेत.रविवारी सायंकाळी ताबूत, पंजे विसर्जन मिरवणूक पारंपरिक थाटात सुरू होती. पापाची तिकटी, गंगावेशमार्गे हे पंजे पंचगंगा नदीकडे प्रयाण करीत होते. याचवेळी विसर्जन मिरवणुकीमुळे या मार्गावर प्रचंड गर्दी होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पापाची तिकटीहून घसरतीला केएमटी बस जात असताना ती विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत घुसली. यामुळे परिसरात हाहाकार उडाला. या दुर्घटनेत दोन भाविक जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमींंना नागरिकांनी तातडीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. संतप्त जमावाने केएमटी बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवून बसची तोडफोड केली. त्यानंतर काही वेळात ही बस पेटवून दिली. प्राथमिक तपासात केएमटी बसचा ब्रेक निकामी झाल्याची माहिती आहे.जमाव इतका प्रक्षुब्ध झाला की, त्यांनी त्या ठिकाणी आलेल्या पोलिसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला; पण जमावाचा संताप वाढत चालला होता. पेटविलेली केएमटी बस विझविण्यासाठी घटनास्थळी आलेल्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांवरही जमावाने हल्ला चढवून या गाड्यांचीही मोडतोड केली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण तयार झाले होते.